कोल्हापूर, 26 डिसेंबर : मिस्टर, मिस अँड मिसेस स्टाईल आयकॉन इंडिया 2023 ही राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धा कोल्हापुरात प्रथमच आयोजित करण्यात आली आहे. येत्या 8 जानेवारी रोजी ही स्पर्धा पार पडणार आहे. कोल्हापुरात पार पडत असणाऱ्या मिस्टर, मिस अँड मिसेस स्टाईल आयकॉन इंडिया या स्पर्धेचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. प्रभास फ्लिम्स आणि कृष्णा प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा घेतली जाणार आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा गोवा या ठिकाणी पार पडली होती. यंदा या स्पर्धेमध्ये कोल्हापूरसह मुंबई, पुणे, ओडिसा, राजस्थान या ठिकाणाहून मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून आई दुर्गा फाउंडेशन या संस्थेला मदतीचा हात देण्यात येणार आहे. कोल्हापुरातील ही संस्था एचआयव्ही बाधित रुग्णांना मदत करण्याचे कार्य करते अशी माहिती स्पर्धेचे आयोजक अक्षय मोरे यांनी दिली आहे.
Success Story : नोकरी करत केला 6 महिन्यांचा कोर्स, आता करतात लाखोंची कमाई! Video
मिस्टर, मिस अँड मिसेस इंडिया 2023 ही स्पर्धा येत्या 8 जानेवारी 2023 रोजी पार पडेल. कोल्हापुरातील महाराजा बँक्वेट हॉल येथे ही स्पर्धा पार पडणार आहे, तर 7 तारखेला स्पर्धकांचे ग्रुमिंग सेशन होणार आहे. हे ग्रुमिंग सेशन हॉटेल थ्री लिव्हस या ठिकाणी पार पडणार आहे. आई दुर्गा फाउंडेशन या एचआयव्ही बाधित रुग्णांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मदत करण्याचे काम स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असे मोरे यांनी सांगितले. कशी पार पडेल ही स्पर्धा? या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत तीन प्रकारचे राऊंड होणार आहेत. त्यातील एक वेस्टर्न राउंड, एक ट्रॅडिशनल राऊंड आणि एक टॅलेंट राऊंड देखील होणार आहे. या स्पर्धेसाठी स्पर्धकांची मर्यादा संख्या ही 25 आहे. मिस्टर इंडिया, मिस इंडिया, मिसेस इंडिया या स्वरूपाचे टायटल या स्पर्धेतून देण्यात येणार आहेत, असे देखील मोरे यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारची स्पर्धा कोल्हापुरात प्रथमच होत आहे. या स्पर्धेला कोल्हापूरकरांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन अक्षय मोरे यांनी केले आहे. संपर्क : +918446151607