औरंगाबाद, 26 डिसेंबर : उद्योगी व्यक्तीला एखाद्या कामाची आवड असली की ते पूर्ण झाल्याशिवाय चैन पडत नाही. अडचणी, जबाबदारी, परिस्थिती यामुळे ते काम लांबणीवर पडतं. त्यामुळे काही जण निराश होतात. तर काही जण संधी मिळाली की ते काम नक्की पूर्ण करतात.
औरंगाबादच्या
सुरेखा कंचनकर या देखील यापैकीच एक आहेत. त्यांनी 15 वर्ष नोकरी केल्यानंतर आपला आवडीचा छंद पूर्ण करण्याचे ठरवले. त्याबाबत फक्त 6 महिने शिक्षण घेतले आणि आज त्या लाखो रुपयांची कमाई करत आहेत. घरातून मिळालं प्रोत्साहन मूळच्या परभणी जिल्ह्यातील असलेल्या सुरेखा महेश कंचनकर यांचे बालपण आणि शालेय शिक्षण येलदरी या गावात झालं. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण होताच त्यांना औरंगाबाद शहरातील एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळाली. त्या कंपनीत त्या कायम झाल्या. चार वर्षाच्या नोकरीनंतर त्यांचं औरंगाबाद शहरातील इलेक्ट्रिशन महेश कांचनकरी यांच्याशी विवाह झाला. सुरेखा यांची नोकरी सकाळी लवकर असल्यामुळे त्यांना साडेतीन वाजता उठून घरातील स्वयंपाक आणि आवरून कंपनीत जायला लागायचं पंधरा वर्षे सलग त्यांनी घरचे आणि कंपनीची जबाबदारी समर्थपणे पाळली मात्र लहानपणापासून कलेच्या आवड असल्यामुळे आपणही नोकरीसोबत व्यवसाय करावा असा विचार त्यांच्या डोक्यात आला आणि त्यांनी तो पती महेश यांना बोलून दाखवला. यामुळे पती महेश यांनी क्षणाचाही विचार न करता सुरेखा यांना ब्युटी पार्लर व्यवसाय संदर्भात माहिती घेऊन घराच्या घरून व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिलं.
पर्यटनाच्या राजधानीची नवी ओळख, मेडिकल टुरिझमसाठी मिळतीय पसंती, Video
6 महिन्याचा कोर्स आणि लाखोंची कमाई सुरेखा यांचा व्यवसाय वाढत गेला. त्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी मुंबई आणि पुण्यात जाऊन त्यांनी कोर्स केला. घरातील कामावरून कंपनीत काम करून आल्यानंतर त्या पार्लरला वेळ देत असत. त्यांचा व्यवसाय वाढत गेला सध्या त्यांच्याकडे औरंगाबाद शहरासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील ग्राहक येत असतात. या व्यवसायातून पूर्वीच्या पगारापेक्षा चौपट कमाई होते, अशी माहिती सुरेखा यांनी दिली. सुरेखा या फक्त स्वत:चा व्यवसाय सुरू करुन थांबल्या नाहीत. त्यांनी पाच जणांना रोजगार दिला आहे. त्याचबरोबर प्रत्येक मुलीने आणि महिलांनी घरातच बसून न राहता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असा त्यांचा आग्रह असतो. त्यासाठी स्वत:च्या ब्युटी पार्लरमध्ये त्या महिलांना प्रशिक्षणही देतात.
सुट्ट्यांचा घ्या भरपूर आनंद; नववर्षासाठी आहे खास ऑफर, पाहा video
इच्छाशक्ती होती म्हणून… सध्या लग्नचा सिझन सुरू असल्यानं सुरेखा यांच्या पार्लरमध्ये मोठी गर्दी होत आहे. यावर्षी महाराष्ट्रीय पेशवाई, साऊथ इंडियन, बंगाली, रजवाडी या मेकअपचा ट्रेन्ड आहे. त्याचबरोबर हळदी, संगीतसह लग्नातील प्रत्येक प्रकार आणि रिस्पेशनसाठी वेगवेगळ्या प्रकारचा मेकअप करण्यास नवरी मुलीची पसंती असते. यामधील सर्वात कमी किंमतीचा मेकअप 20 हजारांपासून सुरू होतो, अशी माहिती सुरेखा यांनी दिली. नोकरी करून घर सांभाळणं हे प्रत्येक महिलासाठी कठीण असतं. माझ्यासाठी नोकरी, घर आणि व्यवसाय सांभाळणे हे मोठं चॅलेंज होतं. पण, माझ्यात तीव्र इच्छाशक्ती होती म्हणून मी प्रयत्न सुरू ठेवले. या प्रयत्नांमुळेच मी तिन्ही जबाबदाऱ्या पूर्ण करू शकले. त्यामध्ये मला चांगलं उत्पन्न मिळतं. प्रत्येक महिलांनी आणि मुलींनी घरातच न बसता स्वतःचा व्यवसाय सुरू करावा अशी माझी इच्छा आहे, अशी भावना सुरेखा यांनी बोलून दाखवली.
गुगल मॅपवरून साभार