Home /News /maharashtra /

राज्याच्या चिंतेत नवी वाढ, कोल्हापूरमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव, एका महिलेचा मृत्यू

राज्याच्या चिंतेत नवी वाढ, कोल्हापूरमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव, एका महिलेचा मृत्यू

  राज्यभरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

राज्यभरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

राज्यभरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

    कोल्हापूर, 21 जुलै : राज्यात कोरोनाची (corona) लाट ओसरली आहे. सर्व निर्बंध हटवण्यात आले आहे. पण, आता राज्यासमोर नवे संकट उभे ठाकले आहे. मुंबईपाठोपाठ राज्यात स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा ( swine flu) शिरकाव झाला आहे. पाचगाव येथील एका महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ( Swine flu in Kolhapur) कोरोनातून सावरलेल्या महाराष्ट्रावर ऐन पावसाळ्यात आता मंकीफॉक्स आणि स्वाईन फ्लूचे दुहेरी संकट ओढावले आहे. राज्यभरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. कोल्हापूरमध्ये स्वाईन फ्लूने शिरकाव केला आहे. पाचगाव येथील एका महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. मालूताई कांबळे (वय 66) असं या मृत महिलेचं नाव आहे. 15 जुलै रोजी या महिलेची चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मागली आठवड्यभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण प्रकृती साथ देत नसल्यामुळे उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण जिल्ह्यात सहा रुग्णांवर उपचार सुरू आहे. स्वाईन फ्लूने महिलेचा मृत्यू झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. सर्व नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे मुंबमध्येही पावसाळ्यात साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. शहरात स्वाईन फ्लू (Swine Flu) च्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. मुंबईत चार जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शहरात स्वाईन फ्लूचा संसर्ग वाढत चालला आहे. ज्यांचा कोरोना चाचणी निगेटिव्ह येत आहे, अशा नागरिकांची एच 1 एन 1 चाचणी करावी, असं सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. (क्रीम्सची गरजच नाही; घरगुती उपाय करून घालवा प्रेग्नन्सी स्ट्रेच मार्क्स) जुलै महिन्यात एच1 एन1 चे 11 रुग्ण आढळून आले आहे. तर जून महिन्या रुग्णांची संख्याही 2 वर होती. डॉक्टरांनी माहिती दिली की, दररोज दोन-तीन रुग्ण आढळून येत आहे. कोरोनाप्रमाणेच H1N1 ही एक संसर्गजन्य रोग आहे. 2019 मध्ये एच1एन1 ने हातपाय पसरवण्यास सुरुवात केली. मागील आठवड्यात राज्यात H1N1 ने पहिल्या मृत्यूची नोंद झाली. 10 जुलै रोजी पालघरमध्य एका 9 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या