मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Stretch Marks : क्रीम्सची गरजच नाही; घरगुती उपाय करून घालवा प्रेग्नन्सी स्ट्रेच मार्क्स

Stretch Marks : क्रीम्सची गरजच नाही; घरगुती उपाय करून घालवा प्रेग्नन्सी स्ट्रेच मार्क्स

प्रेग्नन्सीनंतर अनेक महिलांसाठी समस्या असते ती शरीरावरील स्ट्रेच मार्क्सची.

प्रेग्नन्सीनंतर अनेक महिलांसाठी समस्या असते ती शरीरावरील स्ट्रेच मार्क्सची.

प्रेग्नन्सीनंतर अनेक महिलांसाठी समस्या असते ती शरीरावरील स्ट्रेच मार्क्सची.

मुंबई, 21 जुलै : प्रेग्नन्सी हा महिलेचा पुनर्जन्म असं म्हणतात. कारण स्त्रीचं आयुष्य बाळंतपणानंतर पूर्ण बदलून जातं. शारीरिक, मानसिक या दोन्ही पातळ्यांवर अनेक वेगवेगळे बदल स्त्रियांमध्ये होत असतात. शारीरिक थकवा, हॉॉर्मोन्समधले बदल, मानसिक ताण, नैराश्य याचप्रमाणे शरीराच्या ठेवणीतही बदल होतो. शरीराच्या विविध भागांवर, विशेषतः पोटावर स्ट्रेच मार्क्स (Stretch Marks) येतात. त्यावर वेळीच उपाय केला नाही, तर ते लवकर जात नाहीत. ते घालवण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात.

गरोदरपणात (Pregnancy) महिलांसाठी त्रासदायक ठरणारी गोष्ट म्हणजे शरीरावरचे स्ट्रेच मार्क्स. गर्भातल्या बाळाची वाढ होते, तेव्हा पोटाच्या पेशी ताणल्या जातात. त्यामुळे त्वचेवर अशा पद्धतीचे व्रण दिसू लागतात. केवळ पोटावरच नाही, तर दंड, मांड्या आणि कमरेच्या आजूबाजूच्या भागावर अशा पद्धतीचे व्रण येतात. या स्ट्रेच मार्क्समुळे शरीराचं सौंदर्य कमी होतं. यावर वेळीच उपाय केला, तर हे व्रण कमी होऊ शकतात. घरातल्या काही गोष्टी वापरून (Home Remedies) स्ट्रेच मार्क्स घालवता येऊ शकतात.

हे वाचा - पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध, पण क्लिनिकल चाचण्यांचे चकित करणारे परिणाम आले समोर

एक चमचा लिंबाच्या रसात बेकिंग सोडा घालून तो त्या जागी लावावा. हलक्या हातानं तिथे चोळा. 10 ते 15 मिनिटं तसंच ठेवून मग धुऊन टाका. एका आठवड्यात तीन ते चार वेळा हा उपाय केला, तर काहीच दिवसांत फरक दिसू लागतो. लिंबू आणि सोडा यांच्यात ब्लिचिंग गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचेवरचे डाग जाऊ शकतात.

पोटावर स्ट्रेच मार्क्स यायला सुरुवात झाली असेल, तर तेलानं मालिश करणं फायदेशीर ठरू शकतं. तेलामुळे त्वचेला मऊपणा येतो, तसंच पोषणही होतं. यामुळे हे व्रण मोठे होत नाहीत. नारळाचं तेल, बदाम तेल एकत्र करून किंवा ऑलिव्ह तेलानं (Olive Oil) रोज दिवसातून दोन वेळा मालिश केलं, तर स्ट्रेच मार्क्स जाण्यास मदत होते.

चंदनही स्ट्रेच मार्क्सवर उपयुक्त असतं. त्यासाठी चंदनाच्या खोडाची पावडर करून घ्या. त्यात हळद घालून त्याची पेस्ट तयार करा. स्ट्रेच मार्क्सवर ही पेस्ट लावून वाळू द्या. मग धुऊन टाका. हा उपाय नियमित केल्यानं व्रण निघून जातात.

हे वाचा - Skin Care : चेहऱ्यावर दिसतायत फाईन लाईन्स आणि सुरकुत्या? आवळ्याच्या मदतीने अशी घ्या त्वचेची काळजी

कोरफड जेल (Aloe Vera) सुरकुत्या घालवण्याचं काम करते. पोटावरचे स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी रोज कोरफड जेलनं मसाज करा. काहीच दिवसांत तुम्हाला फरक दिसून येईल.

बाळंतपणात आरोग्य जपणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे आई आणि बाळाची तब्येत व्यवस्थित राहते. त्यात शरीरावर येणाऱ्या स्ट्रेच मार्क्ससारख्या गोष्टीदेखील खूप महत्त्वाच्या असतात. त्यावर वेळीच उपाय केले, तर शरीराचं सौंदर्य अबाधित राहू शकतं.

(सूचना - हा लेख आरोग्यविषयक सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. या उपायांची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. न्यूज 18 लोकमत याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Lifestyle, Pregnancy, Pregnant, Pregnant woman