जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / महिला महाराष्ट्र केसरीला वादाच्या आखाड्याचं स्वरुप, दोन्ही संघटनांनी ठोकले शड्डू

महिला महाराष्ट्र केसरीला वादाच्या आखाड्याचं स्वरुप, दोन्ही संघटनांनी ठोकले शड्डू

महिला महाराष्ट्र केसरीला वादाच्या आखाड्याचं स्वरुप, दोन्ही संघटनांनी ठोकले शड्डू

महाराष्ट्राची कुस्तीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरीची लगबग सुरू आहे. पण ही स्पर्धा वादात सापडलीय.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 25 एप्रिल : महाराष्ट्राची कुस्तीपंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये महिला महाराष्ट्र केसरीची लगबग सुरू आहे. दिपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या कुस्ती स्पर्धांसाठी राज्यभरातून स्पर्धक कोल्हापुरात दाखल होत आहेत. मात्र ही स्पर्धा सुरू होण्याआधीच वादात सापडलीय. काय आहे वाद? भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर नेमलेल्या अस्थाई समितीच्या परवानगीने आणि दीपाली भोसले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने ही स्पर्धा होणार आहे. कोल्हापूरातील ऐतिहासिक खासबाग मैदानात 27 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा होणार आहे. त्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान ‘सध्या कोल्हापुरात होत असलेल्या ही कुस्ती स्पर्धा अनधिकृत आहे, या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेला कोणतीही मान्यता नाही, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीरशी संलग्न जिल्हा व शहर तालीम संघांनी या अनधिकृत स्पर्धेत कसल्याही प्रकारचा सहभाग घेऊ नये, अन्यथा जिल्हा व शहर तालीम संघांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा तालीम संघाचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी एक पत्रक काढून दिला आहे.

    News18लोकमत
    News18लोकमत

    काय आहे इशारा? सांगली या ठिकाणी पार पडलेली स्पर्धा हीच पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा होती, असे संलग्नित जिल्हा व शहर तालीम संघाना महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषेदेकडून कळविण्यात आले आहे. त्याचबरोबर कोल्हापूर येथे पार पाडत असलेल्या या स्पर्धेत सहभागी होऊ नये आणि तसे केल्यास त्या जिल्हा/शहर तालीम संघावर शिस्तभंगाची कारवाही करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. या पत्रकात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या पंचांनाही स्पर्धेसाठी जाऊ नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा तालिम संघाचे सरचिटणी बाळासाहेब लांडगे यांनी दिला आहे. ‘हा’ स्टॉल नाही तर आहे बुलेट! मुंबईच्या 3 मित्रांनी कसा केला पुस्तकांसाठी जुगाड? कोल्हापुरातली स्पर्धाच अधिकृत या स्पर्धेच्या आयोजिका अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ही स्पर्धा अधिकृत असल्याचा दावा केलाय.  ‘तुमची स्पर्धा अधिकृत असती तर, त्या स्पर्धेत खेळलेली मल्ल पुन्हा कोल्हापुरात खेळायला आली नसती. त्याचबरोबर कोल्हापुरात आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा भारतीय महासंघाची आहे. दिल्लीवरून ही स्पर्धा घेतली जात आहे. त्यामुळे इथे जिंकणारी कुस्तीगीर ही पुढे देशपातळीवर खेळणार आहे,  असे सय्यद यांनी स्पष्ट केले आहे. कशी असेल स्पर्धा? महाराष्ट्र केसरीची गदा ही कुस्ती क्षेत्रात एक मानाचा किताब आहे. त्यामुळे स्पर्धेसाठी लांब-लांबहून स्पर्धक हजेरी लावत असतात.  अधिकृत स्पर्धेबाबत कुस्तीगीर परिषद आणि दिपाली सय्यद यांच्यात वाद सुरू असला तरी स्पर्धकांमध्ये मात्र या स्पर्धेची उत्सुकता वाढत चालली आहे. कोल्हापुरातील ही महिला महाराष्ट्र केसरी किताब पटकविणाऱ्या महिला कुस्तीगिरास चारचाकी गाडी देण्यात येणार आहे. तर द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे रोख बक्षीस असणार आहे, असे अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी स्पष्ट केले. या स्पर्धा 50, 53, 57, 59, 62, 65, 68, 72 आणि 76 अशा विविध वजनगटात पार पडणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 10 वजन गटामध्ये सुमारे 400 महिला कुस्तीगीर सहभागी होणार असल्याचं सय्यद यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात