वैभव पाटील, राकेश म्हात्रे आणि अंकेश साटले या 3 मित्रांनी एकत्र येऊन बखर साहित्याची हा उपक्रम सुरू केलाय.
बोरिवली, दहिसर भागातील नागरिकांना वाचनासाठी पुस्तके सहज मिळावीत म्हणून चक्क बुलेटचे रूपांतर पुस्तकांच्या स्टॉलमध्ये केले आहे. वाचन वेड्या मित्रांच्या बखर साहित्याची या उपक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
हे तिन्ही मित्र त्यांची नोकरी सांभाळून शनिवार - रविवारी संध्याकाळी 07.00 ते रात्री 11.00 या वेळेत बोरिवली पूर्वेच्या शांतीवन परिसरात बुलेटवर बुक स्टॉल लावतात.
या बुक स्टॉलवर फक्त मराठी पुस्तकं मिळतात. ऐतिहासिक साहित्य, काव्य संग्रह, कथा- कादंबरी, आध्यात्मिक, प्रेरणादायी, राजकीय, अशी अनेक पुस्तकं 10 ते 1000 रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत.
मुंबईत दुकानांचा भाडं हे परवडणार नाही. त्यामुळे जुगाडू डोकं लावून आम्ही बुलेटचा वापर स्टॉलमध्ये केला आहे, अशी माहिती राकेश म्हात्रे याने यावेळी दिली.