कोल्हापूर, 2 जानेवारी : जेम्स कॅमेरून अवतार 2 हा हॉलिवूडपट भारतासह जगभर सुपरहिट ठरला. देशातील वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांमध्ये हा चित्रपट डब झाला असून तिथंही तो बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. संपूर्ण जग गाजवणाऱ्या 'अवतार 2' या सिनेमाच्या निर्मितीमध्ये आपल्या कोल्हापूरच्या मुलांचा मोठा वाटा आहे.
अवतारमध्ये ओतले 'प्राण'
तांत्रिक बाजू हा अवतार सिनेमाचा प्राण आहे. या सिनेमाती स्पेशल इफेक्ट्स, व्हीएपएक्स थक्क करणारी आहेत. संपूर्ण जग त्याच्या प्रेमात आहे. साऱ्या जगाला भूरळ घालणाऱ्या या व्हिएफएक्सचं काम कोल्हापुरात झालं आहे. या सिनेमातील काही दृश्यांमध्ये व्हीएफएक्स आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून स्पेशल इफेक्ट्स देत कोल्हापूरच्या तरुण मुलांनी त्यांचं कौशल्य सिद्ध केलंय.
मधुर अजित चांदणे, वसीम इकबाल मुल्लाणी, विशाल विलास गुडूळकर या कोलाहापूरच्या तरूणांना या क्षेत्रातील तब्बल 15 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 2015 साली ग्राफिक्सच्या कामासाठी की-फ्रेम' नावाचा खास स्टुडिओ सुरू केला.या स्टुडिओमध्ये वेगवेगळ्या व्यावसायिक कामांसोबतच नवोदितांना प्रशिक्षण देण्याचं कामही ते करतात.
प्रेरणादायी! विडी कामगार महिलेनं सुरू केलं 'हाऊस ऑफ पराठा' Video
दिल्लीच्या एका स्टुडिओकडून त्यांना अवतारचे काम मिळाले. शिवतेज पाटील, संदेश दाभाडे, प्रथमेश वसरगावकर, राहुल कांबळे, रणजित पाटील, दत्ता पाटील, सुधीर पाटील, सुनील सुतार, किरण भूपती या कोल्हापूरच्या तरुणांनी हे काम केलं आहे.
कोल्हापूरमध्ये काय काम झालं?
व्हिज्युअल ग्राफिक्स एडिटिंग मध्ये रोटो, पेंट आणि कंपोजीटिंग अशा प्रकारच्या कामांचा समावेश असतो. यातील रोटो म्हणजे फ्रेम बाय फ्रेम इमेज कट किंवा क्रॉप करणे. पेंट म्हणजे व्हिडीओ फ्रेम मधील अनावश्यक गोष्टी काढून टाकणे आणि कंपोजीटिंग अर्थात व्हिडिओचे बॅकग्राउंड बदलणे या गोष्टींचा समावेश असतो. अवतार 2 चित्रपटाच्या एडिटिंग मध्ये या विद्यार्थ्यांनी रोटो आर्टिस्ट आणि अन्य काही विभागातील काम पूर्ण केले आहे. या चित्रपटातील जवळपास 40 ते 50 दृश्यांच्या व्हीएफएक्सचे काम कोल्हापुरात करण्यात आले आहे.
कसं केलं काम?
एका हॉलिवूडपटाच्या व्हीएफएक्सचे काम म्हणजे अत्यंत महत्वाची जबाबदारी होती. हे काम करण्यासाठी या टीमनं प्रचंड मेहन घेतली. जवळपास एक ते दीड महिना हे काम सुरू होते, अशी माहिती मधुर चांदणे यांनी दिली.
आत्तापर्यंत कोणती कामं केली?
या संस्थेतील विद्यार्थ्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स आणि ॲनिमेशनच्या माध्यमातून सुमारे 400 प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे. यामध्ये अनेक हिंदी-मराठी, तेलुगू-तमिळ, चित्रपट, मालिका, जाहिराती आणि काही हॉलिवूडपटांचा समावेश आहे. सिंबा चित्रपटाचे टायटल ट्रॅक, ब्रह्मास्त्र सिनेमातील ‘डान्स का भूत’ हे संपूर्ण गाणे, बॉइज 3 मधील अनेक दृश्यांना या स्टुडिओमध्ये व्हिज्युअल इफेक्ट्स देण्यात आले आहेत.
हिंदी चित्रपट - टोटल धमाल, सिंबा, माऊली, ब्रम्हास्त्र, टायगर जिंदा है,
दक्षिणात्य चित्रपट - आर आर आर, बाहुबली २
मराठी चित्रपट - दुनियादारी, प्यार वाली लव स्टोरी, गुरू, रेनी डेज, सुर सपाटा, पेईंग घोस्ट , बॉईज ३,
हॉलिवूडचे चित्रपट - अवतार 2, अमेजिंग स्पायडर मॅन, थॉर, वकांडा फॉरेवर, डॉ. स्ट्रेंज
वेब सीरिज आणि मालिका - ब्रीद, रंगबाज, प्रोजेक्ट 9191, कपिल शर्मा शो, एव्हरेस्ट, रविंद्रनाथ टगोर
पुण्यातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून झाला गावचा सरपंच! पाहा Video
काही महत्वाच्या मेट्रो सिटीज सोबतच आता कोल्हापुरात देखील अशी जागतिक स्तरावरील कामे होत आहेत. त्यामुळे अनेक मोठ मोठ्या चित्रपट, मालिका, जाहिरातींच्यासाठी काम करण्याचा अनुभव कोल्हापूरच्या तरुणांना मिळत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Hollywood, Kolhapur, Local18