कोल्हापूर, 22 नोव्हेंबर : कोल्हापुरी माणसं त्यांच्या रांगडेपणासाठी ओळखली जातात. त्याचप्रमाणे कोल्हापूरची भाषाही लाल रश्शाप्रमाणे झणझणीत आहे. कोल्हापूरकरांना त्यांच्या कोल्हापुरी भाषेचा खूप अभिमान असतो, हे बऱ्याच वेळा दिसून आले आहे. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेल्या एका लग्नाच्या पत्रिकेवरुनही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. अस्सल कोल्हापूरी भाषेतल्या या पत्रिकेनं सगळीकडं 'नाद खुळा' केला आहे.
कोल्हापुरी भाषेचा ठसका
आरजे सुम्या दा म्हणून तरुणांमध्ये लोकप्रिय असलेला सुमित मोगले हा कोल्हापूरचा आहे. सुमितचं लग्न ठरलंय. आरजे म्हणून काम करताना त्यानं स्वत:ची ओळख ही 'अस्सल कोल्हापुरी पोरगं' अशी बनवलीय. रांगड्या कोल्हापूरी शैलीतले त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध आहेत.
कोल्हापूरी रांगड्या भाषेसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुमितने ही अस्सल कोल्लापुरी भाषेत लग्नपत्रिका काढली. त्याचे कोल्हापुरी भाषेवर असणारे प्रेम हेच अशी पत्रिका काढण्यामागचे कारण होते. त्याने लग्नाचं निमंत्रण द्यालोय,, यायलाच लागतंय, असे कोल्हापूर स्टाईलनेया पत्रिकेत आमंत्रण दिले आहे. तर पाहुणे मंडळींना देण्यासाठी त्याने पारंपारिक पद्धतीने एक दुसरी लग्नपत्रिका देखील छापली आहे.
ब्राझील, अर्जेंटीना की जर्मनी? कोल्हापूरकरांसाठी कोणती टीम आहे 'लय भारी' पाहा Video
काय आहे मजकूर ?
'लग्नाचं निमंत्रण द्यालोय.. यायला लागतंय.. २६ नोव्हेंबरला म्हणजे शनवारी ४ वाजता साखरपुडा हाय आणि सांच्याला ७ वाजता हळदी.. डीजे तेन सांगिटलाय. लोळून नाचूया.. तुम्ही फक्त वेळ काढून या.. २७ नोव्हेंबरला म्हणजे रव्वारी १ वाजून ३ मिंटाचा मुहूर्त काढलाय भडजीनं लग्नाचा. नाटकं सांगायची न्हाईत. गपगुमान यायचं. तसा खर्च बी ढीग केलाय त्यामुळं इषयच न्हाई. जेवणा-बिवनाची सोय हाय.. पत्ता माहित्या न्हवं ? पद्मपरी हॉल कळंब्यातला.. कात्यायनीला जाताना ओ.. हा तिथंच हाय लगीन.. या बघा १००% वाट बघतो. आणि आहेर तेन काय आणू नगासा. तुम्ही या फक्त लई झालं.'
करा हो लगीनघाई! 2023 सालातील लग्नाचे सर्व शुभ मुहूर्त एका क्लिकवर
सुमित आणि श्वेताच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. सुमितने त्याच्या पत्रिकेत कोल्हापुरी भाषेचा ठसका आणि नात्यातील आपुलकीचा गोडवा अशा दोन्ही बाजू दाखवून दिल्या आहेत. त्यामुळेच ही पत्रिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
सुमितचे लग्न ठरल्याचा विश्वास बसेना..सुमितने या आधी त्याच्या म्युझिक अल्बम्सच्या प्रमोशन वेळी त्याच्या लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर टाकली होती. तेव्हा ते सर्वांना खरे वाटले होते. पण ते प्रमोशनसाठी आहे हे नंतर कळले. असे दोन वेळा घडले होते. त्यामुळे आता त्याचे खरेच लग्न ठरले आहे यावर त्याच्या मित्रमंडळींना विश्वास लवकर बसला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.