जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur News: कोल्हापूरच्या सिद्धनाथची गरुडझेप, कुस्तीत सातासमुद्रापार पटकावले सिल्व्हर मेडल, Video

Kolhapur News: कोल्हापूरच्या सिद्धनाथची गरुडझेप, कुस्तीत सातासमुद्रापार पटकावले सिल्व्हर मेडल, Video

Kolhapur News: कोल्हापूरच्या सिद्धार्थची गरुडझेप, कुस्तीत सातासमुद्रापार पटकावले सिल्व्हर मेडल, Video

Kolhapur News: कोल्हापूरच्या सिद्धार्थची गरुडझेप, कुस्तीत सातासमुद्रापार पटकावले सिल्व्हर मेडल, Video

कोल्हापुरी मल्ल सिद्धनाथ पाटील यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकाची कमाई केली आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 19 जून : कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणून ओळखलं जातं. येथील अनेक पैलवान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत असतात. घरची परिस्थिती प्रतिकूल असली तरी देखील जिद्द आणि मेहनतीच्या बळावर अनेक मैदाने मारतात. असाच परिस्थिशी संघर्ष करत कोल्हापुरी मल्ल सिध्दनाथ पाटील यांनं आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बाजी मारलीय. नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये त्यानं रौप्य पदकाची कमाई केलीय. आमशीच्या सिद्धनाथचा रुपेरी डाव सिध्दनाथ पाटील हा कोल्हापूरच्या करवीर तालुक्यात आमशी गावचा तरुण आहे. गेली सहा वर्षे तो जवळच दोनवडे येथे असणाऱ्या कुस्ती कोच संदीप पाटील यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. गेल्या काही वर्षात तो कुस्तीत चांगलाच तरबेज झालाय. त्यामुळेच त्याने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत 2021 आणि 2022 साली सुवर्णपदकांची कमाई केली होती. तर नुकत्याच पार पडलेल्या युनायटेड वर्ल्ड रेस्टलिंगतर्फे आयोजित आशियाई चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळवले आहे. 17 वर्षांखालील 48 किलो वजनी गटात त्याने ही कामगिरी केली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

घरची परिस्थिती बेताची सिध्दनाथ हा सध्या एनआयएस कुस्ती केंद्र दोनवडे येथे राहतो. तर त्याचे घर हे आमशी या गावी आहे. अत्यंत साध्या मातीने लिंपलेल्या घरी तो त्याचा भाऊ आणि आई वडील असे चौघे असतात. त्याचे वडील हे दुसऱ्याच्या शेतात भाड्याचा ट्रॅक्टर चालवण्याचे काम करतात. तर आई गेली 17 वर्षे शेतमजुरी करते. बाहेर काम करून पुन्हा घरी गॅस परवडत नसल्याने सिध्दनाथच्या आईला चुलीवर जेवण बनवावे लागते. खरंतर घरण्यातच कुस्तीची परंपरा आहे. त्यामुळेच आम्ही आमच्या दोन्ही मुलांना कुस्तीसाठी प्रोत्साहन देत आलो आहोत, असे सिध्दनाथचे वडील कृष्णात पाटील यांनी सांगितले. तर इतक्या लहान वयात सिध्दनाथने आंतरराष्ट्रीय पातळीवर बक्षीस मिवल्यामुळे खूप आनंद झाल्याचे मत आई वैशाली पाटील यांनी व्यक्त केले. कशी झाली आशियाई चॅम्पियनशिप युनायटेड वर्ल्ड रेस्टलिंगतर्फे आयोजित आशियायी चॅम्पियनशिप किर्गिजस्तान देशाची राजधानी बिश्केक या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेसाठी भारतीय संघात 10 मल्लांची टीम पाठवण्यात आली होती. त्यापैकी एक पुणे तर दुसरा कोल्हापूरचा सिध्दनाथ हे 2 मल्ल महाराष्ट्राचे होते. ग्रिको रोमन 48 किलो गटात जपान, कोरिया, कझाकिस्तान आदी मल्लांना पराभूत करत सिध्दनाथ अंतिम फेरीत पोहोचला होता. अंतिम फेरीत यजमान किर्गिजस्तानच्या मल्लाकडून पराभूत झाल्यामुळे सिध्दनाथला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पहिली ते दहावीपर्यंत शाळेतच गेली नाही! आज आहे कॅालेजमध्ये, कसं काय? SPECIAL VIDEO सिध्दनाथला मदतीची गरज आता मिळवलेले आंतरराष्ट्रीय पदक हे सिद्धनाथचे पहिलेच आंतरराष्ट्रीय पदक आहे. मात्र, याआधीच त्याची वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी देखील निवड झालेली आहे. सध्या त्याचा त्यासाठीचा सराव सुरू आहे. वस्ताद हरी पाटील, कुस्ती कोच संदीप पाटील यांच्याकडून त्याची तयारी करून घेतली जात आहे. मात्र तयारीच्या बाबतीत तो कुठेही कमी पडत नसला तरी खुराकासाठी त्याला आर्थिक अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे दानशूरांकडे मदतीचे आवाहन पै. सिद्धनाथ पाटील आणि त्याचे कुटुंबीय त्याच बरोबर कुस्ती कोच संदीप पाटील यांनी केले आहे. दरम्यान, जोमाने तयारी करत असलेल्या सिद्धनाथला जर आर्थिक मदत आणि प्रोत्साहन मिळाले, तर तो नक्कीच भारतासाठी पदके मिळवू शकतो, असा विश्वास देखील त्याच्याबद्दल व्यक्त केला जातोय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात