कोल्हापूर/ पंढरपूर : विरेंद्र उत्पात : कुस्तीचा सराव करताना 23 वर्षीय पैलवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोल्हापुरातील एका तालमीत काल(दि. 03) सोमवारी प्रकार घडला. मारुती सुरवसे असे या पैलवानाचे नाव आहे. तो मूळचा पंढरपूर जवळ असलेल्या वाखरीत राहणार आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान मारुतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून सुरवसे हा कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करत आहे. रात्री तालमीत कुस्तीचा सराव करू अंघोळ करत असताना अचानक छातीत दुखू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयत मारूतीचे वडील वाखरीत शेती करतात. मारूतीला लहानपणा पासूनच कुस्तीची आवड होती. कुस्तीमध्ये करियर करण्यासाठी त्याला कोल्हापूर येथील तालमीत कुस्तीच्या सरावासाठी पाठवण्यात आले होते. मारूतीच्या मृत्यूमुळे कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : बटन दाबल्यावर दरवाजा उघडला पण आत लिफ्टच नव्हती.., इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यासोबत घडलं भयानक
दरम्यान, मारूती सुरवसे याचे वडील शेतकरी आहेत. त्याच्या मृत्यूने पंढरपूर तालुक्यात आणि कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मागच्या वर्षापासून मारुती कोल्हापुरातील तालमीत कुस्तीचा सराव करीत होता. काल रात्री त्याने नेहमीप्रमाणे कुस्तीचा सराव केला.
त्यानंतर तो अंधोळीसाठी गेला, त्यावेळी त्याला अस्वस्त वाटू लागले. त्याच्यासोबत असणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचार सुरु असताना मारुतीचा मृत्यू झाला.
कोल्हापुरात मागच्या 20 दिवसांत दुसरी घटना
मागच्या महिन्यातील 20 तारखेला शंकर चौगले नावाच्या पैलावनाचा बुडून मृत्यू झाला होता. राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा इथं राहणारा शंकर हा मोतीबाग तालमीत सराव करत होता. पोहायला गेल्यावर रंकाळा तलावाजवळ असणाऱ्या खाणीत तो बुडाला होता.