कोल्हापूर, 26 नोव्हेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील कर्नाटक सीमेला लागून असलेल्या बेळगाव व चंदगड तालुक्याच्या सीमेवर किटवाड (ता. चंदगड) येथे लघुपाटबंधारा धरण आहे. या ठिकाणी एख छोटेसे धबधब्याचे ठिका आहे. हा ठिकाण पिकनीक स्पॉट असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. दरम्यान या ठिकाणी खोल खड्ड्यात पडून बेळगाव येथील चार मुलींचा मृत्यू झाला आहे. तर एका तरुणीला वाचवण्यात यश आले.
घटनास्थळावरील तीन मुलांनी 5 जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला पंरतु चौघांचा मृत्यू झाला तर एका तरुणीला वाचवण्यात यश आले आहे. आज (दि.26) सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली आहे. 40 महाविद्यालयीन तरुणी पर्यटनासाठी आल्यानंतर ही घटना घडली आहे.
हे ही वाचा : सख्या मुलीसारखा जीव लावला, पण शेवटी तिनेच आई-बाबांचा काटा काढला; भावालाही संपवण्याचा होता प्लॅन
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असलेल्या किटवाड धबधब्यात बेळगावमधील 4 महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू झाला. यातील उज्वल नगर येथील असिया मुजावर (वय 17), अनगोळची कुदासिया पटेल (वय 20), रुक्षार बिस्ती (वय 20) आणि तस्मिया (वय 20) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरुणींची नावे आहेत.
याप्रकरणाची चंदगड पोलिसात नोंद झाली आहे. बेळगावहून 40 कॉलेज तरुणींचा गट विकेंड साजरा करण्यासाठी किटवाड धबधबा येथे गेल्या होत्या. त्यावेळी पाच तरुणी सेल्फी काढण्यासाठी थांबल्या होत्या. सेल्फी काढताना पाय घसरून तरुणी पडल्या आणि त्यात चौघींचा बुडून मृत्यू झाला.
या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडून पुढे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे सुमारे 12 फूट खड्डा पडला आहे. याठिकाणी सेल्फी घेताना ही घटना घडली आहे. दरम्यान, तातडीने किटवाड येथील महेश हेब्बाळकर, विजय लाड, आकाश पाटील तरुणांनी धाव घेऊन पाण्याच्या खड्ड्यातून पाचही तरुणींना बाहेर काढले आणि पुढील उपचारासाठी बेळगाव येथे नेण्यात आले होते. एका तरुणीला वाचवण्यात या तरुणांना यश आले.
हे ही वाचा : अरे बापरे! हे काय? अशा अवयवासह जन्माला आली चिमुकली की पाहून डॉक्टरही शॉक
याबाबत माहिती अशी की, किटवाड येथे दोन धरणे आहेत. यातील एका धरणावर धबधब्याचे पाणी पडून तयार झालेल्या खड्ड्यात या तरुणी आंघोळीसाठी पाण्यात उतरल्या होत्या. पहिली तरुणी खड्ड्यात पडल्याने तिला वाचवण्यासाठी गेलेल्या पाचही तरुणी पाण्यात बुडाल्या. यामधील चार जणींचा जागीच मृत्यू झाला. तर एकीला वाजवण्यात यश आले. बचावलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारासाठी बेळगाव येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.