मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात गेला अन् तिथेच संपवले आयुष्य, कोल्हापुरातील घटना

जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात गेला अन् तिथेच संपवले आयुष्य, कोल्हापुरातील घटना

कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लक्ष्मीपूरीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लक्ष्मीपूरीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लक्ष्मीपूरीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 09 फेब्रुवारी : कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लक्ष्मीपूरीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांने हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना आज (दि.09) सकाळी पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.‌ 48 वर्षीय जयसिंग ज्ञानदेव कणसे असे मृत झालेल्या रुग्णाचे नाव असून करवीर तालुक्यातील शिरोली पुलाची गावचे ते रहिवासी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी इथं असणाऱ्या सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांने हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (दि.09) सकाळी घडली.‌ काल (दि.08) बुधवारी दुपारी ते सूर्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून त्यांनी उडी घेतली. 

हे ही वाचा : चार आत्महत्या, मोबाईल अन् अंधश्रद्धा! पॅटर्नही सेम, कोल्हापूरच्या गावात खळबळ

डोक्याला वर्मी मार लागल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला, हॉस्पिटल प्रशासनाने याबाबतची माहिती लक्ष्मीपुरी पोलिसांना कळवली, मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आला आहे. हॉस्पिटल परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

सांगली जिल्ह्यातही धक्कादायक प्रकार

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील झारीबाग परिसरात पाचव्या मजल्यावरून पडून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना काल (दि.07)संध्याकाळी घडली. 

हे ही वाचा : सर्वांचा लाडका अवघ्या 9 महिन्याचा कृष्णराज पिठाच्या भांड्यात पडला अन्… कोल्हापुरातील ह्रदय पिळवटून टाकणारी घटना

यष्वी दीनेश देशमाने (वय 04 वर्षे) असे या मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. दरम्यान अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिरज शहरातील झारीबाग परिसरातील बुधगावकर मळा येथे ही घटना घडली आहे.

First published:

Tags: Crime news, Kolhapur, Suicide case