कोल्हापूर, 04 फेब्रुवारी : कोल्हापुरातील करवीर तालुक्याच्या वडणगे गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या नऊ महिन्यांच्या बाळाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या चिमुकल्याचा घरात ठेवलेल्या पिठाच्या भांड्यावर तोल गेला. यावेळी तो पिठाच्या भांड्यावर पडल्याने त्यांच्या नाका तोंडात पिठ गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाला. कृष्णराज राजाराम यमगर (वय ९ महिने, रा.जुना वाशीनाका) असे या चिमुकल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसात माहिती देण्यात आली आहे. ही घटना समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णराज हा घरी खेळत असताना त्याचा पिठाच्या भांड्यात तोल जाऊन दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे. दुर्घटना घडताच चिमुकल्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेले. मात्र, नाका-तोंडात पीठ गेल्याने गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. दरम्यान ही बाब घरच्यांना समजताच रुग्णालय परिसरातच नातेवाईकांनी हंबरडा फोडला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा : 6 हजारांच्या वादातून बायकोचे नियंत्रण सुटले, नवऱ्यासोबत केलं भयानक कांड
कोल्हापुरातील जुना वाशीनाका येथे राहणाऱ्या सुप्रीया राजाराम यमगर या आपला लहान मुलगा घेऊन वडणगे येथे आजीकडे आल्या होत्या. दरम्यान, काल संध्याकाळच्या सुमारास कृष्णराज वॉकरमधून खेळत होता. मात्र, चालता-चालता त्याचा गव्हाच्या पिठाच्या भांड्यात तोल गेला आणि तो त्यात पडला. भांड्यामध्ये पीठ मोठ्या प्रमाणात असल्याने कृष्णराजच्या तोंडात आणि नाकात गव्हाचे पीठ गेले आणि ते पीठ त्याच्या नाका-तोंडात चिकटून बसले.
दरम्यान, आजीने त्याला त्वरित त्या भांड्यातून बाहेर काढले आणि नाका तोंडात पीट गेल्याचे लक्षात येताच त्याला कुटुंबीयांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
हे ही वाचा : मालेगाव : दारू प्यायला पैसे दिले नाही, दोन मुलांनी आईसोबत केलं भयानक कृत्य
मात्र, दवाखान्यात नेण्यापूर्वीच नाकात आणि तोंडात पिठ चिकटल्यामुळे चिमुकल्याचा गुदमरून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. नऊ महिन्यांच्या बालकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी हंबरडाच फोडला. परिसरात याबाबतची माहिती करतात सर्वांमधून हळहळ व्यक्त होऊ लागली. दरम्यान, आता या घटनेची करवीर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kolhapur