मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

kolhapur sugarcane farmer : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याने एफआरपीचे तुकडे करणारा कायदा मागे घेण्याचा केला ठराव

kolhapur sugarcane farmer : कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' साखर कारखान्याने एफआरपीचे तुकडे करणारा कायदा मागे घेण्याचा केला ठराव

राज्यातील साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अशक्य नसल्याचे कारण देत. एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

राज्यातील साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अशक्य नसल्याचे कारण देत. एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

राज्यातील साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अशक्य नसल्याचे कारण देत. एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 15 सप्टेंबर : राज्यातील साखर कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे अशक्य नसल्याचे कारण देत. एफआरपीचे तुकडे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. (kolhapur sugarcane farmer) यानंतर राज्यातील अनेक शेतकरी संघटनांनी आक्रमक भुमीका घेत विरोध केला. दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी यांनी  याबाबत जनजागृती करत एफआरपीचे तुकडे केल्यास आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टी यांनी रान उठवण्यास सुरूवात केली. यादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकीत मानला जाणाऱ्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याने एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकीत मानला जाणाऱ्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या 66 व्या वार्षिक सर्व साधारण सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांना एक रक्कमी एफआरपी देण्याचा ठराव करावा अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभुशेटे यांच्या नेतृत्वाखाली मांडण्यात आली. यावेळी सर्व शेतकरी सभासद यांनी एकजूट दाखवत संचालक मंडळास हा ठराव मंजूर करण्यास भाग पाडले. या ठरावास कारखान्याच्या संचालक मंडळाने मंजूर करून शासनानेही एकरकमी एफआरपी देण्याचा शासन निर्णय करण्याचा ठराव या सभेत करण्यात आला.

हे ही वाचा : काँग्रेसने सर्व काही देलेले पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस सोडणार? कराडमध्ये पत्रकार परिषद

दरम्यान महाविकास आघाडी सरकारने दोन टप्यात एफआरपी देण्याचा कायदा केल्याबद्दल निषेध करण्यात आला. वाढलेली महागाई, खताचे, मजुराचे व मशागतीचे वाढलेले दर यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. केंद्र सरकारने एफआरपी चा बेस वाढवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने कारखान्यांनी एक रक्कमी एफआरपी देण्याची मागणी केली. यावेळी सर्व शेतकरी, सभासद यांनी एकजूट दाखवत संचालक मंडळास हा ठराव मंजूर करण्यास भाग पाडले.

शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी द्या असा वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव करणारा देशभक्त रत्नाप्पाणा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना राज्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे.

माजी खासदार राजू शेट्टी हे ज्या ठिकाणी सभा घेतील त्यावेळी शेतकऱ्यांना साखर उद्योगातील आर्थीक गणीताची मांडणी करून सांगत. यामुळे शेतकऱ्यांना आपण पिकवत असलेल्या उसापासून कारखानदारांसह व्यापाऱ्यांना किती मोठा फायदा होतो आणि आपण किती तोट्यात राहतो याबाबत सांगतात याचा प्रभाव शेतकऱ्यांवर झाला आहे. झालेल्या वार्षीक सभेत शेतकऱ्यांनी मांडलेले गणित पाहून कारखान्याला एकरकमी एफआरपी देण्यास भाग पाडत ठराव मंजूर करून घेतला.

हे ही वाचा : फॉक्सकॉन प्रकल्पासाठी शिंदे सरकारची धावाधाव, शिंदे, फडणवीस आणि राणे घेणार मोदींची भेट

एफआरपीबाबत राज्य सरकारने दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला आहे. उसाचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात असताना एफआरपीचे दोन तुकडे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान यावर शरद पवार यांनी हा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. यावर ते म्हणाले राज्यातील कारखान्यांनी या निर्णयाचे पालन करून दोन टप्प्यात एफआरपी द्यावे असे सांगितले होते. ते पुढे म्हणाले होते साखर कारखाने टिकवण्यासाठीच हा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Kolhapur, Sugar facrtory, Sugarcane, Sugarcane farmer, Sugarcane in maharashtra

पुढील बातम्या