कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह पोस्टवरून हिंदुत्ववाद्यांनी बंदची हाक पुकारली आहे. आंदोलकांनी छत्रपती शिवाजी चौकात मोठी गर्दी केली होती.
छत्रपती शिवाजी चौकात गर्दीत आंदोलकांकडून दगडफेक झाल्याचा आरोप होत आहे. यामुळो पोलिसांकडून जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला.
आक्षेपार्ह पोस्टविरोधात आंदोलकांनी बंदची हाक दिली होती. यानंतर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
पोलीस अधीक्षकांनी हिंदुत्ववादी आंदोलकांनी बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं असून शांतता राखावी असं म्हटलं आहे.
पोलीस अधीक्षकांनी हिंदुत्ववादी आंदोलकांनी बंद मागे घ्यावा असं आवाहन केलं असून शांतता राखावी असं म्हटलं आहे.