मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Kolhapur Police : कोल्हापुरात ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दारूचा सुळसुळाट लाखाेंची दारू पकडली

Kolhapur Police : कोल्हापुरात ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दारूचा सुळसुळाट लाखाेंची दारू पकडली

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात मुद्देमालासह 46 लाख 69 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Kolhapur Police)

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात मुद्देमालासह 46 लाख 69 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Kolhapur Police)

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात मुद्देमालासह 46 लाख 69 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Kolhapur Police)

  • Published by:  Sandeep Shirguppe

कोल्हापूर, 21 सप्टेंबर : कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात मुद्देमालासह 46 लाख 69 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Kolhapur Police) राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाकडून करवीर तालुक्यातील भोगावती येथे छापा टाकला. यामध्ये 36 लाख 69 हजार रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारू आणि गाडीसह एकूण 46 लाख 69 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईमध्ये एकाला अटक करण्यात आले आहे. पुढच्या काही दिवसांत कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभुमीवर ही कारवाई करण्यात आल्याने जोरदार चर्चा होत आहे.

गोवा बनावटीची दारू एवढ्या मोठ्या प्रमाणात विकण्यासाठी जात असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली यावरून पोलिसांनी सापळा रचत कारवाई केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू येत असल्याचे समजताच आम्ही वेळीच प्रसंगावधान साधत संबंधितांवर कारवाई केली असल्याचे ते म्हणाले.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या भाषणाआधीच लोक सभेतून निघाले, गुलाबरावांनी आवरतं घेतलं भाषण, VIDEO

या कारवाईत दहा लाखांचा सहा चाकी टेम्पो आणि गोवा बनावटीच्या दारूचे 512 बॉक्स असा एकूण 46 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी रमेश तांबोसकर (वय 33, रा. टेंबेवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) याला अटक करण्यात आले आहे.

नितीश रमेश तांबोसकर (वय 33, रा. चराठा, ता. सावंतवाडी) असे या ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे 36 लाख ६९ हजार रुपयांच्या दारूसह 10 लाखाचा टेम्पो असा एकूण 46 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. जिल्ह्याच्या प्रत्येक सीमेवर कडक तपासणी होत असतानाही इतका मोठ्या प्रमाणात मद्यसाठा कोल्हापूर जिल्ह्यात पोहचलाच कसा असा सवाल उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

हे ही वाचा : दसरा मेळाव्याच्या आधीच उद्धव ठाकरेंची तोफ गरजणार! सत्तांतरानंतर पहिल्यांदा सेनेचा मेळावा

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त बी. एच. तडवी व निरीक्षक. एस. जे. डेरे यांचे आदेशाने दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, कॉन्स्टेबल सर्वश्री पवार, संदिप जानकर, शंकर मोरे, दिपक कापसे, योगेश शेलार यांनी केली पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.

First published:

Tags: Crime news, Kolhapur, Police action, Police arrest

पुढील बातम्या