जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur Police Arrest : मध्यरात्री ATM मध्ये शिरली तेव्हा होती स्त्री, बाहेर पडली तर निघाला पुरुष; काय आहे नेमका प्रकार?

Kolhapur Police Arrest : मध्यरात्री ATM मध्ये शिरली तेव्हा होती स्त्री, बाहेर पडली तर निघाला पुरुष; काय आहे नेमका प्रकार?

Kolhapur Police Arrest : मध्यरात्री ATM मध्ये शिरली तेव्हा होती स्त्री, बाहेर पडली तर निघाला पुरुष; काय आहे नेमका प्रकार?

कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात चोरीची घटना समोर आली आहे. महिलेच्या वेशात येत एटीएम चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 14 फेब्रुवारी : कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात चोरीची घटना समोर आली आहे. महिलेच्या वेशात येत एटीएम चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दरम्यान चोरी करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती आहे. काल मध्यरात्री जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. अंकुश नामदेव कोंडारे (वय ३२, रा. नाळे कॉलनी, संभाजीनगर) असे त्याचे नाव आहे.

जाहिरात

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील मुख्य असणाऱ्या संभाजीनगर रोडवर रात्री पावणेदोनच्या सुमारास एक पुरूष महिलेच्या वेषात चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. याबाबतची फिर्याद उत्तम भीमराव राणे यांनी दिल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्यातून देण्यात आली आहे.

हे ही वाचा :  प्रेयसीच्या भावाला अडकवण्यासाठी राम मंदिर उडवण्याची दिली धमकी, अखेर असा झाला शेवट

संभाजीनगर परिसरातील एक बॅंकेच्या एटीएममध्ये चोरीचा प्रयत्न होत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. त्यामुळे जुना राजवाडा पोलिस ठाण्यातील गस्तीचे पथक तातडीने रवाना झाले. त्यांनी एटीएमजवळ जाऊन पाहणी केली. यावेळी पंजाबी ड्रेस, ओढणीने चेहरा बांधून एटीएममध्ये चोरी करण्याचा प्रयत्न एक महिला करीत असल्याचे दिसून आले.

तेव्हा पंजाबी ड्रेस, गुलाबी रंगाचा पायजमा, तोंडाला काळा स्कार्फ अशा महिला वेशात रेकॉर्डवरील गुन्हेगार अंकुश कोंडारे हाच असल्याचे गस्तीवरील पथकाला दिसून आले. एटीएममध्ये घुसून मशिनचा ‘हुड डोअर’ उघडून चोरी करण्याचा प्रयत्न तो करीत होता. हा प्रकार परिसरातील एका व्यक्तीने पाहिल्यानंतर त्याने पोलिसांना कळविले होते. त्यामुळे गस्ती पथक तातडीने पोहोचणे शक्य झाले. दरम्यान, एटीएमच्या सर्व्‍हरवरूनही याची माहिती पुढे आल्याचे सांगण्यात आले.

जाहिरात

हे ही वाचा :  ज्याला लहानाचं मोठं केलं, त्यानेच घरात पाडला आई-वडिलांच्या रक्ताचा सडा, कोल्हापूर हादरलं

अंकुश कोंडारे हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याला जुना राजवाडा पोलिसांनी 2018 मध्ये चार घरफोड्यांच्या कारणावरून अटक केली होती. तसेच गतवर्षीही त्याच्याकडून एक चोरी उघडकीस आणली आहे. गेली काही दिवस पोलीस त्याच्या शोधात होते. तो कोल्हापुरात भाड्याच्या घरात राहत होता. सध्या तो बार्शी (जि. सोलापूर) येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्याचे आई-वडील मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करून पोट भरत असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात