कोल्हापूर, 29 डिसेंबर : कोल्हापुरात डिसेंबर महिन्यात पर्यटकांची संख्या ही वाढलेली असते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेण्यासाठी, कोल्हापुरातील अनेक पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करत असतात. तर नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर देखील बऱ्याच जणांनी नियोजन केलेलं असतं. त्यामुळेच कोल्हापुरात पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्ह्यात पोलिस बंदोबस्तात वाढ देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे थर्टी फर्स्टसाठी एन्जॉय करताना नागरिकांना काळजी घेऊनच आनंद साजरा करावा लागणार आहे. अन्यथा कायद्याचे उल्लंघन महागात पडू शकते. कारवाईला देखील सुरुवात 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशन साठी जवळपास नाताळ अर्थात 25 डिसेंबरपासूनच तयारी सुरू झालेली असते. यावेळी नववर्ष स्वागतावेळी कायदा व सुव्यवस्थेसाठी कोल्हापूर पोलीस दल सक्रिय झाले आहे. सेलिब्रेशन साठी बाहेर पडल्यावर मद्याच्या नशेत बऱ्याच वेळा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते. तर काही तरुण हुल्लडबाजी करताना दिसतात. या पार्श्वभूमीवर नाताळ सणापासूनच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ठीकठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे. यावेळी ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईला देखील सुरुवात झाली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे.
Kolhapur : उंचच उंच ऊस ते प्रचंड रेडा! कृषी प्रदर्शनात पाहा कशाची हवा, Photos
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई याशिवाय या कालावधीत गोवा आणि कर्नाटक राज्यातून मद्य आणि गुटख्याची तस्करी होण्याची मोठी शक्यता असते. यामुळेच जादा तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कडक कारवाई केली जाणार असल्याचं देखील शैलेश बलकवडे यांनी सांगितले. खास कोल्हापूरला भेट द्यायला आलेले, गोव्याला जाणारे, दक्षिण भारतात जाणारे असे सगळेजण प्रामुख्याने कोल्हापुरात या कालावधीत थांबतात. 25 डिसेंबर ते 1 जानेवारी हा एक मोठा पर्यटक हंगाम असतो. या अनुषंगाने कोल्हापुरातील प्रमुख पर्यटन स्थळांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. ट्रॅफिक जाम होऊ नये यासाठी नवरात्रीप्रमाणे अतिरिक्त पार्किंग स्पॉट देखील वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलेले आहेत. यासोबतच कोणत्याही शस्त्राचा वापर होऊ नये, यासाठी कॉबिंग ऑपरेशन राबवले जाणार आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आलेली आहे, असे देखील शैलेश बलकवडे यांनी स्पष्ट केले.
नवीन वर्षात कोल्हापूरमध्ये सौंदर्य स्पर्धा, देशभरातील स्पर्धक होणार सहभागी
कोणीही वाद न घालता सहकार्य करावे प्रामुख्याने रात्रीच्या वेळी आणि 31 तारखेला बंदोबस्ताचे नियोजन मोठ्या प्रमाणात राहणार आहे. जेव्हा नागरिक आनंदोत्सव साजरा करत असतात तेव्हा त्यांनी हे लक्षात ठेवावे, की रस्त्यावर असणारे सर्व पोलीस अधिकारी हे नागरिकांच्याच सेवेसाठी तैनात असणार आहेत. जर त्यापैकी कोणी कोणत्याही कागदपत्रांची मागणी होते किंवा नीट वागणुकीसाठी समज देण्यात आली तर कोणीही वाद न घालता त्यांना सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केली आहे.