Home /News /maharashtra /

Kolhapur: वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू? संतप्त नागरिकांचे भर पावसात आंदोलन

Kolhapur: वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू? संतप्त नागरिकांचे भर पावसात आंदोलन

कोल्हापूर : वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचे भर पावसात आंदोलन

कोल्हापूर : वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू; संतप्त नागरिकांचे भर पावसात आंदोलन

व्हेंटिलेटरवर असताना वीज पुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

    ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 3 जून : व्हेंटिलेटरवर असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू (Patient died after power cut) झाला आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केलं. (Kolhapur man died after power cut alleged relatives) करवीर तालुक्यातील उचगाव येथील ओमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटरवर लावला होता. त्यांना फुप्फुसाचा आजार असल्याने गेले वर्षभर घरातच उपचार सुरू होते. थकित वीज बिलापोटी त्यांच्या घराची वीज कनेक्शन महावितरणने बंद केले होते. त्यामुळे शेजारून वीज घेऊन त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र रात्री पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आणि यातच ओमेश यांचा मृत्यू झाला याप्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या व कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांमधून होत आहे. या प्रकरणी संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय आवारात भरपावसात ठिय्या आंदोलन करत महावितरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये संध्याकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली.वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. तर अनेक भागात रस्त्यावर पाणीच पाणी साचून राहिले.विजांचा कडकडाट आणि गारांसह काही भागात पाऊस झाला.मान्सून पूर्व मशागतीची जी कामे होती त्या कामांना या पावसाचा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. राज्यात मान्सूनपूर्व पाऊस राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान मुंबई, पुण्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात तापमानात वाढ झाल्याने मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ वातावरण होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. रत्नागिरी, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी, तर नाशिक, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Death, Electricity cut, Kolhapur, Maharashtra News, Patient death

    पुढील बातम्या