मुंबई, 02 जून : राज्याच्या सीमेवर मान्सूनने (monsoon update) हजेरी लावली असताना मान्सून पूर्व (pre monsoon rain) पावसाने मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह, विजांच्या कडकडाचा पाऊस झाला, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, तसेच कोकणातील(kolhapur, sangli,solapur, konkan heavy rain fall ) काही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. दरम्यान सोलापूर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे.
राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान झाल्याने विविध ठिकाणी पावसाला सुरूवात झाली आहे. आज (ता. 02) कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान मुंबई, पुण्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात तापमानात वाढ झाल्याने मान्सून पूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : OMG! दुधामध्ये आढळले डिटर्जंट, 'या' घरगुती पद्धतीनं ओळखा दुधातील भेसळ
मागच्या 24 तासांमध्ये वर्धा येथे 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ वातावरण होत असून, उकाड्यात वाढ झाली आहे. रत्नागिरी, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी, तर नाशिक, नगर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.
उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून पूर्व बांगलादेशपर्यंत पूर्व-पश्चिम हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्याच्या विविध भागात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असून, आज (ता.02) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
2 June: येत्या 4 आठवड्यांसाठी पावसाचा विस्तारित श्रेणीचा अंदाज दुसऱ्या आठवड्यापासून (10 जून) पासून पश्चिम व पूर्व किनारपट्टीवर पाऊस वाढण्याचे संकेत देते ERF for rainfall for coming 4 weeks indicates strengthening of rainfall activity frm 2nd week (10 June) onwards. IMD pic.twitter.com/fgEnAwMwCa
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 2, 2022
वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद
मागच्या 24 तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे 37.2, धुळे 40.8, कोल्हापूर 34.1, महाबळेश्वर 28.0, नाशिक 33.8, निफाड 36.4, सांगली 36.1, सातारा 36.8, सोलापूर 38.0, सांताक्रूझ 34.4, डहाणू 34.5, रत्नागिरी 34.7, औरंगाबाद 40.5, परभणी 40.6, नांदेड 39.2, अकोला 42.4, अमरावती 42.2, बुलडाणा 39.2, चंद्रपूर 42, गोंदिया 42.5, नागपूर 42.6, वर्धा 43. तापमानाची नोंद झाली आहे.
हे ही वाचा : राज्यात दारूची होम डिलिव्हरी बंद, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक हवामान नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) गुजरातच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. उद्यापर्यंत (ता. ३) मध्य अरबी समुद्र कर्नाटक, तमिळनाडूचा आणखी व भागासह कोकण, गोव्याच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
मान्सून केरळमध्ये (Monsoon arrives in Kerala) दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागा (IMD)कडून दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली. मान्सूनचे आगमन होणार असल्याने शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. दरम्यान यंदा देशात पुरेसा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. यंदा देशात 96 ते 106 टक्के पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे यंदा देशात सगळीच धरणे भरण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Monsoon, Weather forecast, Weather update, Weather warnings