कोल्हापूर, 16 नोव्हेंबर : कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या तीन वर्षात 2019 आणि 2021 साली पंचगंगा नदील महापूर येऊन गेल्यानंतर नदी पात्रात मगरींचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे वारंवार निर्दशनास आले आहे. यामुळे नदी पात्रात बिंधास्त पोहणाऱ्यांवर मगरीमुळे धास्ती वाढली आहे. यामुळे सध्या नदीपात्राकडेचा लोकांचा वावर कमी झाला आहे. तसेच पोहायला जाणार्या नागरिकांनी गेले काही दिवस वावर कमी केला आहे. काल कोल्हापुरातील पंचगंगा नदी पात्रावर मगरीचा थरारक क्षण कॅमेरात कैद झाला आहे.
काल (दि.15) दुपारी काही शेतकरी नदीकडेला शेतात काम करीत असताना नदीत मगरीचे दर्शन झाले. यावेळी त्या नदीत कुत्राही पोहत किनाऱ्यावर येत होता. दरम्यान मगर आणि कुत्र्यामध्ये जवळपास 100 फुटांचे अंदत होते परंतु मगरीला आपला भक्ष दिसल्याने मगर जोरात पोहत येत किनाऱ्यावर त्या कुत्र्याला गिळून टाकल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. यामुळे कोल्हापुरातील नागरिक भयभीत झाले आहे.
मगरीने पाण्यात पोहणाऱ्या कुत्र्याची चपळाईने शिकार, कोल्हापुरातील दत्तवाड गावातील घटना pic.twitter.com/3CBAQDnpgO
— News18Lokmat (@News18lokmat) November 16, 2022
हे ही वाचा : 'बलात्काराच्या समर्थनात मोर्चा काढणारी भाजप, ताई बाजूला व्हा म्हणल्यावर...', सुषमा अंधारेंचा घणाघात
नदी पात्रात असलेल्या मगरीने भर दुपारी पाण्यात पोहणाऱ्या कुत्र्याची चपळाईने शिकार केली. कोल्हापुरातील दत्तवाड गावात ही घटना घडलीय. दुधगंगा नदीत पोहत असलेल्या एका कुत्र्यावर या मगरीची नजर पडली. कुत्र्यापासून काही अंतरावर असलेल्या या मगरीने मोठ्या चपळाईने कुत्र्याकडे धाव घेतली.
हे ही वाचा : नातू असावा तर असा! आजीच्या निधनानंतरही शब्द पाळला, 'त्या' गिफ्टची सगळीकडेच चर्चा, Video
कुत्र्याला याची चाहूल लागताच त्याने नदीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र इतक्यात मगरीने झडप टाकून त्याची शिकार केली. हा सगळा थरार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान हा व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crocodile, Ganga river, Kolhapur