मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नातू असावा तर असा! आजीच्या निधनानंतरही शब्द पाळला, 'त्या' गिफ्टची सगळीकडेच चर्चा, Video 

नातू असावा तर असा! आजीच्या निधनानंतरही शब्द पाळला, 'त्या' गिफ्टची सगळीकडेच चर्चा, Video 

आलोक चौगुले याने आपल्या आजीला सोन्याची साडी घेण्याचा शब्द दिला होता. आजीच्या निधनानंतरही आलोकने तो शब्द पाळला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nashik, India

नाशिक 11 नोव्हेंबर : आजी रागावली म्हणून नातवाने आजीची निर्घृण हत्या केल्याची किंवा आजी आणि नातवाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येतात. मात्र, कोल्हापूर मधील आलोक चौगुले आणि स्वर्गवासी शामाबाई चौगुले या आजी नातवाच्या घट्ट प्रेमाची गोष्ट सर्वांनाच प्रेरणादायी ठरली आहे. कारण आलोक चौगुले याने आजीला सोन्याची साडी घेण्याचा शब्द दिला होता. आलोकने आजी स्वर्गवासी होऊन देखील तो शब्द पूर्ण केला आहे. त्यामुळे या आजी नातवाच्या प्रेमाची सर्वत्र चर्चा होत आहे.

किरण चौगुले आपल्या कुटुंबासोबत कोल्हापूरमध्ये राहतात. त्यांचा मुलगा आलोक चौगुले हा लहानचा मोठा आपल्या आजीच्या म्हणजे शामाबाई चौगुले यांच्या अंगा खांद्यावर झाला. अलोक आजीचा खूप लाडका होता. एक दिवस सहज आजीच्या प्रेमापोटी आपल्या स्व. कमाई मधून आजी मी तुला माझ्या लग्नात सोन्याची साडी घेईल असा सहज बोलून गेला होता. आलोक चौगुले चांगले शिकून मोठा व्यवसायिक होता आणि आजी नातवाचे नाते आणखी घट्ट होत गेले होते. घरात आलोकच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती नियतीने वेगळंच काहीतरी लिहले होते. 7 नोव्हेंबर 2021 रोजी अलोकची आजी शामाबाई राजाराम चौगुले यांच वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

Pune : तिसरीतल्या संस्कारची कमाल! स्त्रोत पठणाचा केला वर्ल्ड रेकॉर्ड, Video

या घटनेने चौगुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. यात सर्वात जास्त दुःख झाले होते ते आलोकला. कारण की आपल्या स्व. कमाईतून आपल्या लाडक्या आजीला सोन्याची जर असलेली पैठणी खरेदी करायची होती. लग्नात तीच पैठणी आजी नेसणार देखील होती. मात्र, आजी आता देवा घरी गेली होती, आजीची इच्छा अपूर्णच राहिली आपला शब्द अपूर्णच राहिला ही खंत  आलोकला सतावत होती.

वडिलांना दिला होकार 

आजी आपल्या लग्नात कोणत्या ना कोणत्या रूपाने येणार हा विश्वास ही भावना आलोकच्या मनात घर करून बसली होती. आजी आपल्याला सोडून गेली आहे. हे आलोक आजही मानायला तयार नाही. त्यामुळे अलोकने आपले वडील किरण चौगुले यांच्याकडे आपल्या स्वर्गवासी आजीसाठी सोन्याची पैठणी बनवू आणि तिची आठवण म्हणून कायमस्वरूपी फोटो समोर ठेवू अशी इच्छा बोलून दाखवली. अलोकची आजी प्रति तळमळ पाहून मला सुद्धा गहिवरून आलं आणि मी क्षणात होकार दिला,अशी प्रतिक्रिया अलोकचे वडील किरण चौगुले यांनी दिली आहे.

मात्र हे सर्व झाल्यानंतर आता अस्सल पैठणी मिळणार कुठे हा प्रश्न चौगुले कुटुंबांना पडला अशाच वेळी टीव्ही वर अकरा लाखाची पैठणी संदर्भात एक कार्यक्रम नातू आलोक चौगुलेने पाहिला आणि ही पैठणी नाशिक जिल्ह्यातील येवल्यातल्या कापसे पैठणी येथे बनली आहे याची माहिती त्याला मिळाली. क्षणाचाही विलंब न करता आलोक चौगुले त्याचे वडील किरण चौगुले या दोघांनी येवला शहर गाठलं आणि कापसे पैठणीचा शोध घेत कापसे पैठणीचे संचालक दिलीपदाजी खोकले यांची भेट घेतली. सुरुवातीला एवढी महागडी पैठणी वेळेअभावी तयार करणे शक्य होणार नाही असे सांगून दिलीप खोकले यांनी चौगुलेंना नकार दिला.

Nashik : लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या क्रीडांगणाचे पाहा संतापजनक वास्तव, Video

सोन्याची जर असलेली अस्सल चार लाखांची पैठणी

मात्र ही साडी आपल्या स्वर्गवासी आजीची शेवटची इच्छा म्हणून बनवायची आहे. हे ऐकताच कापसे यांनी सोन्याची जर असलेली  पैठणी तयार करून देण्याचे मान्य केले. पैठणी बनवण्यासाठी किमान 8 ते 9 महिन्यांचा कालावधी लागनार होता मात्र आलोकचे लग्न अवघ्या चार महिन्यांवर आले होते. तरी देखील अतिसूक्ष्म कलाकुसर आपल्या कुशल हाताने करत कापसे पैठणीच्या कारागिरांनी दिवस-रात्र एक करून सोन्याची जर असलेली अस्सल चार लाखांची पैठणी साडी तयार केली.

येत्या 28 नोव्हेंबरला नवी मुंबई येथे आलोक चौगुले याचे लग्न असून या लग्नात हि चार लाखांची पैठणी आजीची आठवण म्हणून आजीच्या फोटो पुढे ठेवली जाणार आहे.अशा पद्धतीने आलोकने आपल्या स्वर्गवासी आजीची शेवटची इच्छा आणि आठवण म्हणून चार लाखांची सोन्याची पैठणी साडी खरेदी करून एक प्रकारे आपल्या आजीला दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

First published:

Tags: Kolhapur, Local18, Nashik