मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

देहव्यापार करणारी प्रेयसी दारू पिऊन घरी आली, प्रियकराने आवळला गळा, मृतदेह घेऊन निघाला कर्नाटकला पण...

देहव्यापार करणारी प्रेयसी दारू पिऊन घरी आली, प्रियकराने आवळला गळा, मृतदेह घेऊन निघाला कर्नाटकला पण...

कविता हिच्या आजीला तिने आत्महत्या केल्याचे सांगत मृतदेह गावी घेऊन येत असल्याचे सांगितलं

कविता हिच्या आजीला तिने आत्महत्या केल्याचे सांगत मृतदेह गावी घेऊन येत असल्याचे सांगितलं

कविता हिच्या आजीला तिने आत्महत्या केल्याचे सांगत मृतदेह गावी घेऊन येत असल्याचे सांगितलं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bhiwandi Nizampur, India

भिवंडी, 25 सप्टेंबर : भिवंडी शहरातील हनुमान टेकडी इथं देह व्यापार करणाऱ्या महिलेची शास्त्री नगर येथील इमारतीत तिच्या सोबत राहणाऱ्या प्रियकराने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, हत्या केल्यानंतर मृतदेह कर्नाटक इथं घेऊन जाताना आरोपीला पुण्यात अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता रामप्पा मादर उर्फ मुस्कान सद्दाम सय्यद (वय 24) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. कविता रामप्पा मादर उर्फ मुस्कान सद्दाम सय्यद ही देहव्यापार करणारी महिला त्याच परिसरात राहणाऱ्या सद्दाम शरिफ सय्यद (वय 30) याच्या सोबत प्रेम संबंध असल्याने ते एकत्र राहत होते.

हनुमान टेकडी परिसरात पोलीस कारवाई होणार असल्याचे अफवेने येथील महिला रात्री या वस्तीतून बाहेर निघून जात असल्याने कविता ही सुद्धा तिच्यासोबत राहणाऱ्या सद्दाम याच्या शास्त्रीनगर येथील गुलशन अपार्टमेंट या इमारती मधील फ्लॅटमध्ये रात्री राहण्यास गेली होती. कविता दारू पिऊन त्याच्या फ्लॅटवर गेली होती. त्यामुळे यावेळी दोघे बेडरूममध्ये असताना त्यांच्यात वाद झाला. या वादातून सद्दाम याने कविता हीची गळा आणि तोंड दाबून हत्या केली.

आत्महत्येचा बनाव करून मृतदेह परस्पर विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न 

22  सप्टेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास कविताची हत्या केल्यानंतर विजापूर येथील कविता हिच्या आजीला तिने आत्महत्या केल्याचे सांगत मृतदेह गावी घेऊन येत असल्याचे सांगितलं. त्यानुसार रुग्णवाहिकेत मृतदेह घेऊन सद्दाम गावी जाण्यास निघाला. परंतु सकाळी कविता वस्तीत न आल्याने तिच्याबद्दल इतर महिलांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संशय बळावला. महिलांनी या बाबत शहर पोलीस ठाण्यास माहिती दिल्या नंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस पथकांना कामाला लावून रुग्णवाहिका व तिच्या चालकाचा शोध घेतला.

(चोर नग्न अवस्थेत अंगाला तेल लावून रस्त्यावर फिरायचा, मुंबई पोलिसांनी ठेचल्या नांग्या)

रुग्णवाहिका पुणे परिसरातून जात असल्याचे समजल्याने पोलिसांनी पुणे नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून रुग्णवाहिका महामार्गावर नाकाबंदी करीत थांबविली. रुग्णवाहिकेतील मृतदेहाचे पुणे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले. त्यामध्ये गळा आवळून हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. तोपर्यंत भिवंडी शहर पोलीस पथक पुणे येथे दाखल होत सद्दामला ताब्यात घेत मृतदेह भिवंडी येथे घेऊन आले आहेत.

(अंकिताने वेश्याव्यवसायास दिला नकार, 5 दिवसांपासून बेपत्ता तरुणीचा भयंकर शेवट)

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून कविता हिच्या हत्येचा गुन्हा दाखल करीत प्रियकर सद्दाम शरिफ सय्यद यास अटक केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पो निरी चेतन काकडे हे करीत आहेत.

First published:

Tags: प्रेयसी