जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापुरात पकडलं पाण्यावर तरंगणार 'सोनं', किंमत तब्बल 11 कोटी, काय आहे प्रकार?

कोल्हापुरात पकडलं पाण्यावर तरंगणार 'सोनं', किंमत तब्बल 11 कोटी, काय आहे प्रकार?

पाण्यावर तरंगणार 'सोनं'

पाण्यावर तरंगणार 'सोनं'

विक्री आणि तस्कारीसाठी बंदी असलेल्या व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्याना कोल्हापूर पोलिसांनी आंबोली आजरा मार्गावर सापळा रचून पडकलं आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 27 मे : व्हेल माश्याच्या उलटीला सोन्यापेक्षा अधिक भाव मिळतो. याचा गैरफायदा घेत अनेकदा व्हेल माश्यांची शिकार केली जाते. या गोष्टींना रोखण्यासाठी सरकारने यावर बंदी आणली आहे. मात्र, त्यानंतरही याची तस्करी थांबलेली दिसत नाही. कोल्हापुरात व्हेल माशाची उलटी म्हणजे अंबरग्रीस अवैधरित्या विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्यांना पोलिसांनी आंबोली आजरा मार्गावर सापळा पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडून तब्बल 10 कोटी 74 लाख 10 हजार किमतीची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली आहे. ही आजपर्यंतची कोल्हापूर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापूर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई गेल्या काही दिवसात कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात व्हेल माशाची उलटीची तस्करी केली जात असल्याचे समोर आले आहे. याबाबतीत कोल्हापूर पोलिसांनी दोन ते तीन वेळा सापळा रचून व्हेल माशाची उलटी जप्त केली असतानाच आज पुन्हा एक नवीन प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील गवसे तालुका आजरा येथे आजरा पोलिसांनी 10 कोटी 74 लाख 10 हजार रुपये किमतीचे व्हेल माशाची उलटी जप्त केली. ही आजपर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असून या व्हेल माशाच्या उलटीचे वजन 10 किलो 688 ग्रॅम इतके आहे. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. वाचा - …म्हणे आम्ही पोलीस, दारू तस्करीच्या नावाने टाकला छापा आणि केलं भलंतच कांड याप्रकरणी कुडाळच्या पाच जणांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. कुडाळ येथून व्हेल माशाची तस्करी करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती आजरा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आजरा पोलिसांनी सकाळपासूनच अंबोली आजरा मार्गावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून बसले होते. दरम्यान या मार्गावरून सदर संशयित आरोपी जात असताना पोलिसांच्या निदर्शनास आले आणि गाडीची तपासणी केली असता त्यात व्हेल माशाची उलटी मिळून आली. या प्रकरणी आता आजरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

बाजारात एवढी किंमत का? व्हेल माशाच्या शरीरातून निघालेला अंबरग्रीस (उलटी) हे अत्तर किंवा सुगंधित उत्पादनात वापरतात. जगभरात अत्तर हे लाखोच्या किमतीने विकले जाते. त्यात व्हेल माशाच्या उलटीपासून तयार केलेल्या अत्तर कोट्यवधींना विकत घेतले जाते. एवढेच नाही तर अंबरग्रीसपासून अगरबत्ती आणि धूपही तयार केले जाते. अत्तरात उलटीचा वापर हा फिक्सेटीव्ह म्हणून वापरतात. सेंट कपड्यावर किंवा शरीरावर मारल्यानंतर ते बराच काळ टिकावे यासाठी हे फिक्सेटीव्ह उपयुक्त असते. यासाठी काही केमिकल्स आहेत; परंतु त्याचा शरीरावर परिणाम होतो. उलटी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे त्याला मागणी अधिक आहे. सेंटबरोबरच औषधातही वापर होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात