मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /...म्हणे आम्ही पोलीस, दारू तस्करीच्या नावाने टाकला छापा आणि केलं भलंतच कांड, नेमकं काय घडलं?

...म्हणे आम्ही पोलीस, दारू तस्करीच्या नावाने टाकला छापा आणि केलं भलंतच कांड, नेमकं काय घडलं?

फाईल फोटो

फाईल फोटो

पोलिसांच्या गणवेशातील पाच अज्ञात जण बोलेरोवर आले होते.

  • Local18
  • Last Updated :
  • Bihar, India

संतोष कुमार गुप्ता, प्रतिनिधी

छपरा, 27 मे : बिहारमधील छपरा जिल्हा अनेकदा गुन्हेगारीमुळे चर्चेत राहतो. चोरट्यांनी येथेही दहशत पसरवली आहे. चोरट्यांनी यावेळी चोरीची नवीन पद्धत शोधून काढली आहे. चोरट्यांनी दारू तस्करीच्या बहाण्याने गावोगावी धाड टाकली. छापेमारीत ते शेळ्या-मेंढ्यांचा शोध घ्यायचे आणि त्यानंतर त्यांना आपल्यासोबत चोरून न्यायचे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

असाच एक प्रकार जिल्ह्यातील मेकर पोलीस स्टेशन हद्दीतील गंज मसुरिया गावातून समोर आला आहे. इथे पोलिसांच्या गणवेशातील चोरट्यांनी तीन शेळ्या चोरून पळ काढला. ही बाब सकाळी उघडकीस येताच पोलिसही चक्रावले. पोलिसांच्या गणवेशात आलेल्या चोरट्यांनी घरमालकाला धमकावून बोलेरोमधून तीन शेळ्या घेऊन पळ काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री पोलिसांच्या गणवेशातील पाच अज्ञात चोरटे बोलेरोवर आले आणि त्यांनी घरमालकाला उठवले आणि सांगितले की, पोलिस स्टेशनचा मोठे अधिकारी आहेत. ही ओळख देत घरमालकाला सांगितले की, तू दारूचा व्यवसाय करतोस, तुझ्या घराची झडती घ्यावी लागेल. त्यानंतर घरात घुसून खांबाला बांधलेल्या तीन शेळ्या उचलून बोलेरोवर लादून पळ काढला.

यानंतर घरमालकाने रात्री उशिरा या घटनेची माहिती गावातील सरपंच प्रतिनिधी संजित राय यांना दिली. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. मात्र, पोलिस पोहोचेपर्यंत चोरटे गुन्हा करून पळून गेले होते. घरमालक शौकत मियाँ यांनी या घटनेबाबत पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

छपराच्या अनेक भागात अशा घटना समोर आल्या आहेत. यापूर्वीही मशरक आणि मधुरा येथे पोलिसांच्या गणवेशात येऊन बकऱ्या चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनीही कारवाई केली आहे. पोलिसांनी गारखाजवळ स्कॉर्पिओमधून मोठ्या प्रमाणात बकऱ्या जप्त केल्या होत्या. यानंतर आता पुन्हा ही घटना घडली आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत. पण याप्रकारच्या घटना लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Bihar, Crime, Local18, Police