मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /मालेगाव : दारू प्यायला पैसे दिले नाही, दोन मुलांनी आईसोबत केलं भयानक कृत्य

मालेगाव : दारू प्यायला पैसे दिले नाही, दोन मुलांनी आईसोबत केलं भयानक कृत्य

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

आई -मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या एका घटनेमुळे मालेगाव तालुका हादरला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Malegaon, India

बब्बू शेख, प्रतिनिधी

मालेगाव, 2 फेब्रुवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैशांसाठी जन्मदात्या आईचा मुलांनी गळा अवळून केला निर्घृणपणे खून केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मालेगावच्या दाभाडी येथे ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी मुलांना अटक आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून व्यसनाच्या आहारी गेलेल्या दोन मुलांनी आपल्या जन्मदात्या आईचा दोरीने गळा अवळून निर्घृणपणे खून केला. ही संतापजनक घटना मालेगावच्या दाभाडी येथे घडली आहे. सुलकनबाई सोनवणे, असे या दुर्दैवी मातेचे नाव आहे.

विशेष म्हणजे गळफास दिल्यानंतर आईने आत्महत्या केल्याचा बनाव दोघांनी रचला होता. मात्र, पोलिसांना संशय आल्यानंतर त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली. या घटनेने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी भगवान सोनवणे आणि संदीप सोनवणे दोघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध छावणी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई -मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे मालेगाव तालुका हादरला असून नराधम मुलांना कडक शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा - 10 वीची विद्यार्थिनी, Online Gameमधून प्रेम, प्रियकराला भेटण्यासाठी आतुर, पोहोचली तब्बल 2400किमी

प्रेग्नंट बहिणीच्या मदतीला आलेल्या मुलीसोबत मेहुण्याकडून धक्कादायक कृत्य -

'साली आधी घरवाली' असे चेष्टेने अनेकदा म्हटले जाते. मात्र, कलियुगात याच म्हणीचा अर्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न एका मेहुण्याने केला आहे. 22 जुलै ते 20 ऑगस्ट 2022 या काळात एका मेहुण्याने अल्पवयीन मेव्हणीचे लैंगिक शोषण केले. यातून तिला गर्भधारणा झाली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अमरावती ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी याच हद्दीत राहणाऱ्या एका 40 वर्षीय अनिल नावाच्या जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर बलात्कार, पोक्सो व अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime news, Malegaon news, Murder