कोल्हापूर, 27 ऑगस्ट : मागच्या दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्याच्या अर्जूनवाड आणि जयसिंगपूर येथे आयकर विभागाने धाडी टाकल्या. (Kolhapur Income Tax Raid) दरम्यान या धाडी सोलापूर, पंढरपूरसह अन्य ठिकाणी साखर कारखान्यांवर पडलेल्या छाप्यांच्या साखळीतून येथे पडल्याचे सांगण्यात आले. दरम्यान ही कारवाई गुरूवार (दि.25) अचानक सुरू झाली. ही कारवाई रात्रीपर्यंत झाडाझडती करून हे प्रकरण थांबेल असे सगळ्यांना वाटले परंतु आयकर विभाग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी 1 वाजता पुन्हा पथक दाखल झाले होते. यातील काही कागदांच्या आधारे अनेकांची चौकशी करण्यात येत होती. हे पथक रात्री उशिरापर्यंत अर्जुनवाड येथे होते. त्यामुळे या चौकशीत काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देवळा (जि. नाशिक), सोलापूर, बीड, पंढरपूर यासह 25 ठिकाणी गुरुवारी प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. यात शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाडमध्ये गुरुवारी सकाळी पावणेआठ वाजता पथकाने पोलिस बंदोस्तात छापा टाकला. दिवसभरात जयसिंगपूर संभाजीपूर येथील आलिशान उभारलेल्या बंगल्याची पाहणी करून चौकशी केली. त्यानंतर सांगली येथील प्लॉटची पाहणी करून पुन्हा पथक अर्जुनवाड येथे आले होते. त्यानंतर या पथकाकडून रात्री आठ वाजेपर्यंत चौकशी सुरू होती.
हे ही वाचा : Nashik ACB Raid : आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या घरात छापा, नोटा मोजण्यासाठी मशीनची गरज एवढा पैसा जप्त
दरम्यान, कारखाना भागीदाराच्या घराच्या परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तर शुक्रवारी दुपारी हे पथक पुन्हा कारखाना भागीदाराच्या घरात आले. पुन्हा कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू होते. यातील काही कागदांच्या आधारे अनेकांची चौकशी शुक्रवारी दुपारपासून सुरू होती. याबाबत आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कागदपत्रांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे काही स्पष्ट सांगता येत नसल्याचे सांगितले.
अधिकाऱ्यांना नोटा मोजेपर्यंत घाम निघाला
भारतात अजय देवगणचा पुन्हा एकदा रेड सिनेमासारखा सीन पाहायला मिळाला. अधिकाऱ्यांना नोटा मोजेपर्यंत घाम निघाला मात्र त्या काही संपेना अशी अवस्था झाली होती. एका इंजिनियरच्या घरात लाखोंचं घबाड सापडलं आहे. अधिकारी नोटा मोजून दमल्याची घटना समोर आली आहे.
हे ही वाचा : करुणा मुंडेंची 30 लाखांत फसवणूक, गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
बिहारच्या ग्रामीण बांधकाम विभागात तैनात असलेल्या कार्यकारी अभियंत्याच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली. किशनगंज आणि पाटणा इथला कार्यकारी अभियंता संजय कुमार राय यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरातून सुमारे 5 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. नोटांची मोजणी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax, Kolhapur, Raid