मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

करुणा मुंडेंची 30 लाखांत फसवणूक, गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

करुणा मुंडेंची 30 लाखांत फसवणूक, गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

करुणा मुंडे (फाईल फोटो)

करुणा मुंडे (फाईल फोटो)

करुणा मुंडे यांना आमिष दाखविण्यात आले होते.

  • Published by:  News18 Desk
अहमदनगर, 27 ऑगस्ट : राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांची तीस लाखांची आर्थिक फसवणूक झाली आहे. याप्रकरणी त्यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुनतीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा मुंडेंना दाखविले आमिष - करुणा मुंडे यांना आमिष दाखविण्यात आले होते. एका कंपनीत 30 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला महिन्याला 45 ते 70 हजार रुपये परतावा देऊ, असे आमिष त्यांना दाखवले गेले होते. त्यावरुन करुणा मुंडे यांनी 10 दिवसात वरील रक्कम रोकड व चेक स्वरुपात दिली. मात्र, त्यांना एकदाच 45 हजाराचा परतावा मिळाला. त्यानंतर पैशे मिळाले नाहीत. परतावा तर नाहीच उलट मिळाली धमकी - त्यामुळे करुणा मुंडे यांनी संबंधितांकडे या पैशांबाबत विचारणा केली असता त्याने मुंडे यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. इतकेच नव्हे तर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि बदनामी करण्याची धमकीही दिली, असे करुणा मुंडे यांनी आपल्या फिर्यादित म्हटले आहे. दैनिक लोकमतने याबाबतचे वृत्त दिले आहे. हेही वाचा - 'बीड जिल्हा परिषदेत हरवून दाखवा', मुख्यमंत्री भेटीनंतरं करुणा शर्मांचं धनंजय मुंडेंना चॅलेंज! कोण आहेत करुणा शर्मा-मुंडे? करुणा शर्मा या आपण धनंजय मुंडे यांची पत्नी असल्याचा दावा करतात. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांनीदेखील गेल्यावर्षी फेसबुक पोस्ट टाकून आपण करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं कबूल केलं होतं. तसेच त्यातून आपल्याला दोन अपत्य देखील असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी मोठा गदारोळ झाला होता. करुणा शर्माची बहीण रेणू शर्माने धनंजय मुंडे यांच्याविरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट टाकत आपली भूमिका मांडली होती. त्यानंतर करुणा शर्मा अनेकवेळा चर्चेत आल्या.
First published:

Tags: Ahmednagar News, Crime news, Money fraud

पुढील बातम्या