जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / MPSC Exam : कोल्हापुरातल्या हमालाच्या पोरीने करून दाखवलं.... राज्यात आली पहिली!

MPSC Exam : कोल्हापुरातल्या हमालाच्या पोरीने करून दाखवलं.... राज्यात आली पहिली!

MPSC Exam : कोल्हापुरातल्या हमालाच्या पोरीने करून दाखवलं.... राज्यात आली पहिली!

MPSC Exam : कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका हमालाच्या मुलीनं एमपीएसी परीक्षेत इतिहास रचला आहे.

  • -MIN READ Local18 Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    कोल्हापूर, 8 डिसेंबर : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत ग्रामीण भागातील, प्रतिकूल परिस्थितीशी झगडा करुन अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका हमालाच्या मुलीनं या परीक्षेत इतिहास रचला आहे. तिनं ओबीसी महिलांच्या गटात राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. हमालाची मुलगी बनली अधिकारी कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात पुरेशा सोयीसुविधा नसलेलं जोगेवाडी हे गाव डोंगराळ भागात वसले आहे. या गावातील रेश्मा बाजीराव ऱ्हाटोळ या मुलीनं तिच्या नावाचा ठसा एमपीएससी परीक्षेतून उमटवलाय. रेश्मानं जोगेवाडी गावातच  प्राथमिक शिक्षण घेतले.  त्यानंतर माध्यमिक शिक्षण तळाशी येथील शाळेत तर बिद्रीमध्ये बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं.मेकॅनिकल या ब्रांचमधील डिप्लोमाची पदवी पॉलिटेक्निक कॉलेज, कोल्हापूर येथे प्राप्त केली. तर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने बी.ई. मेकॅनिकल ही इंजिनिअरिंगची पदवी घेतली.  रेश्मानं कॉलेजात शिकत असतानाच सरकारी अधिकारी होण्याचं ध्येय निश्चित केलं होतं. बीडचा शुभम राज्यात पहिला, पाहा 4 वर्षांच्या परिश्रामानंतर कसं मिळलं यश? Video रेश्मानं बीईनंतरया एमपीएससी परीक्षेसाठी पूर्ण वेळ दिला होता. पण काही परीक्षांमध्ये अगदी थोड्या गुणांनी अपयश आले होते. तरी देखील खचून न जाता अभ्यास सुरू ठेवला. आणि त्यातूनच आता राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परिक्षेत यश प्राप्त झाले आहे, वडिलांनी काहीच कमी पडू दिलं नाही रेश्माचे वडील बाजीराव ऱ्हाटोळ हे भोगावती साखर कारखान्यात हमालीचे काम करतात. रेश्माला आणि तिच्या भावांना संपूर्ण शिक्षण पूर्ण करू देताना वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत. पैशाची कोणतीही कमतरता न जाणवू देता त्यांनी रेश्माला सर्व बाजूंनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता तिच्या यशाने त्यांची छाती अभिमानाने फुलून गेली आहे. पोलीस भरती : अखेर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, पाहा काय म्हणतात विद्यार्थी? Video हमाली करत असून देखील बाजीराव ऱ्हाटोळ यांनी एका मुलाला आयटीआय, तर दुसऱ्या मुलाला बीएस्सी पर्यंत शिकवले आहे.  आता, रेश्मानं राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. यामुळे तिचे घरातील सर्व सदस्यांकडून देखील विशेष कौतुक होत आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात