जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / पोलीस भरती : अखेर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, पाहा काय म्हणतात विद्यार्थी? Video

पोलीस भरती : अखेर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, पाहा काय म्हणतात विद्यार्थी? Video

पोलीस भरती : अखेर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ, पाहा काय म्हणतात विद्यार्थी? Video

राज्यातील पोलीस भरतीबाबत 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

  • -MIN READ Local18 Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

    बीड, 29 नोव्हेंबर : महाराष्ट्र पोलीस भरती प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले असताना तांत्रिक अडचणींमुळे उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. याबाबत आता सरकारकडून अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा करत 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यामुळे बीडमधील उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.     पोलीस भरतीत इच्छुक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी अर्ज भरण्यासाठी आता 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज करण्याची वेबसाईट सतत हँग होणे, सर्व्हर डाऊन असणे अशा विविध समस्यांना उमेदवारांना तोंड द्यावे लागले होते त्यामुळे मुदतवाढ देण्यात आली आहे. Video : नोकरी करण्यापेक्षा देणारे बना! सरकारकडून मिळेल मोफत मार्गदर्शन अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर 18 हजार पोलीस पदांची भरती होणार आहे. यासाठीचे अर्ज मागवण्यात आले होते. राज्यात पोलीस भरती जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण होते. पोलीस भरतीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. मात्र, अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. साईटच हँग होणे, सर्व्हर डाऊन होणे अशा समस्यांना विद्यार्थी तोंड देत होते.   पोलीस भरतीसाठी अर्ज भरताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. बीड मधील विद्यार्थी मागील 10 पेक्षा अधिक दिवसांपासून इंटरनेट कॅफेवर चकरा माराव्या लागल्या. तांत्रिक समस्येमुळे अर्ज भरण्याची अंतिम मुदत संपत येत होती. जर विद्यार्थ्यांचा अर्ज वेळीच भरला गेला नाही तर विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागणार होते. यात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन त्वरित उपाय योजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली होती.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: beed , Local18
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात