जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Kolhapur Firing News : मुलीसोबत गैरकृत्य करत होता पती, नकार दिल्याने थेट पत्नीवरच गोळीबार, कोल्हापुरातील घटनेने खळबळ

Kolhapur Firing News : मुलीसोबत गैरकृत्य करत होता पती, नकार दिल्याने थेट पत्नीवरच गोळीबार, कोल्हापुरातील घटनेने खळबळ

Kolhapur Firing News : मुलीसोबत गैरकृत्य करत होता पती, नकार दिल्याने थेट पत्नीवरच गोळीबार, कोल्हापुरातील घटनेने खळबळ

कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार गोळीबार आणि गुंडगिरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 23 डिसेंबर : कोल्हापूर जिल्ह्यात वारंवार गोळीबार आणि गुंडगिरीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाचे शहर समजल्या जाणाऱ्या इचलकरंजीमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. इचलकरंजीला लागून असलेल्या शहापूर येथे स्वतःच्या मुलीशी गैरकृत्य केल्याची वाच्यता करू नये यासाठी पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जाहिरात

दरम्यान तिच्यावर बंदुकीतून गोळी झाडल्याप्रकरणी ‘मोका’तील रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. गोळीबार केलेल्या गुन्हेगाराने यापूर्वी अनेक गुन्हे केल्याने तो कुख्यात गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा :  ओळख, मैत्री, प्रेम, लिव्ह-इन, शरीरसंबंध अन् गर्भवती झाल्यावर मात्र…, अमरावतीच्या तरुणीसोबत काय घडलं?

कुख्यात गुन्हेगारावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, विनयभंग करणे, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोस्को) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबतची फिर्याद संशयिताच्या पत्नीने दिली आहे. संशयिताला अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान इचलकरंजी शहरात या घडलेल्या घटनेची जोरदार चर्चा रंगली होती.

हा गुन्हेगार एप्रिल 2022 मध्ये ‘मोका’च्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला आहे. ऑक्टोबर 2022 पासून संशयिताची मुलगी घरामध्ये एकटी असताना तिच्याशी गैरकृत्य करीत असल्याची माहिती आहे. दरम्यान ती तिच्या मनास लज्जा उत्पन्न झाल्याने तिने त्याला बाजूला ढकलत ती घराच्या खाली पार्किंग विंगमध्ये पळून गेली. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी मुलीने ही घटना आईस सांगितली. तिने याबाबतचा जाब विचारून वागण्यात सुधारणा नाही केली तर घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगून पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले.

जाहिरात

यावर संशयिताने तक्रार करून तर बघ, तुला जिवंत ठेवत नाही, असे म्हणत घरातील बेडवर पाडून पत्नीचा गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न करीत असताना मुलांनी बाजूला ढकलून आईला सोडवले होते. त्यानंतर 10 डिसेंबर रोजी संशयिताने पत्नीच्या दिशेने बंदूक रोखून गोळी झाडली. पत्नी लगेच बाजूला पळाल्याने गोळी बेडरूमच्या दरवाजाजवळील भिंतीमध्ये घुसली.  

हे ही वाचा :  घरात घुसून 15 जणांचं महिला सरपंचासोबत धक्कादायक कृत्य, बुलडाण्याला हादरवणारी घटना

जाहिरात

यावेळी मुलांनाही ठार मारण्याची धमकी दिली. 21 डिसेंबर रोजी पुन्हा नातेवाईकांमध्ये बदनामी करतेस, असे म्हणत त्याने गळा आवळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलाने संशयिताला बाजूला केले. त्यानंतर सायंकाळी पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. अपार्टमेंटमध्येही तो नेहमी दारू पिऊन यऊन बंदुकीची भीती दाखवून दहशत निर्माण करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात