मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /वीज पुरवठा खंडीत होताच 20 वर्षीय मुलाचा खून, कोल्हापुरातल्या घटनेने खळबळ

वीज पुरवठा खंडीत होताच 20 वर्षीय मुलाचा खून, कोल्हापुरातल्या घटनेने खळबळ

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात गुंड आणि सावकारकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 20 वर्षीय पानटपरी वाल्याचा खून झाल्याने खळबळ माजली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात गुंड आणि सावकारकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 20 वर्षीय पानटपरी वाल्याचा खून झाल्याने खळबळ माजली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात गुंड आणि सावकारकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 20 वर्षीय पानटपरी वाल्याचा खून झाल्याने खळबळ माजली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 01 नोव्हेंबर : कोल्हापूर जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होताना दिसत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी कुख्यात गुंडाचा पाठलाग करून खून केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका घटनेने खळबळ माजली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शहर कोल्हापूर शहरानंतर सर्वात मोठे शहर मानले जाते. दरम्यान हे शहर वस्त्रोद्योगात अग्रेसर असल्याने या शहरात पैशाची मोठी उलाढाल होत असते. यामुळे शहरात गुंड आणि सावकारकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान काल(दि.31) रात्री 20 वर्षीय पानटपरी वाल्याचा खून झाल्याने खळबळ माजली आहे.

इचलकरंजी येथील शहापूर परिसरातील विठ्ठलनगरमध्ये राहणारा रहेमान नदाफ याने मागच्या दोन महिन्यांपूर्वी भागामध्ये पान टपरी सुरू केली होती. पान टपरी बंद करून तो मित्रांसोबत जेवायला गेला होता. तेथून परतल्यानंतर तो रात्री अकराच्या सुमारास घराजवळील चौकात मित्रांसमवेत बोलत उभा राहिला होता.

हे ही वाचा : आईच्या डोळ्यादेखत मुलाचं भयानक कृत्य, व्ह्यू पॉईंटवरून मारली खोल दरीत उडी

दरम्यान काही अज्ञात लोकांनी थेट त्याच्यावर वार करत निर्घृण खून केला. हल्लेखोरांनी त्याच्या घराजवळच धारदार शस्त्रांनी वार केल्याने नदाफ याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याबाबत खुनाचे अद्यापही कारण समजू शकले नाही. भरवस्तीत सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.

यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या चार ते पाच हल्लेखोरांनी रेहमानला गाठत व त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. काही सेंकदातच मानेवर तसेच डोक्यावर 9 ते 10 तीक्ष्ण वर्मी घाव बसल्याने रेहमानचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याबाबत नागरिकांच्या लक्षात येताच हल्लेखोरांनी पळ काढला.

भागातील वीजपुरवठा खंडित असल्यामुळे आणखी गोंधळ उडाला. रहमानला तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य इस्पितळात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा : 4 वर्षांचं प्रेम, डोळ्यांवर पट्टी बांधून दिलं सरप्राईज; तरुणीने दुसऱ्यासाठी विषयच संपवला! 

अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, प्रभारी पोलिस उपअधीक्षक रामेश्वर वैंजने, शिवाजीनगरचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे आदींनी रुग्णालयात भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. हल्लेखोरांचा विविध पथकाद्वारे पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. वर्चस्वाच्या वादातून खून झाला असावा, पोलिसांचा कयास आहे. अधिक तपास शहापूरचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Kolhapur, Murder news