भंडारा, 29 ऑक्टोबर : एकीकडे प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत अगदी जीव देणारे प्रेमवीर तुम्ही पाहिले असतील तर दुसरीकडे प्रेमप्रकरणातून अनेक गंभीर गुन्हेही घडतात. अशीच एक गंभीर घटना भंडारा जिल्ह्यात घडली आहे. जी वाचून तुमच्या काळजात चर्रर झाल्याशिवाय राहणार नाही. प्रेमाच्या त्रिकोणात पहिल्या प्रियकराच्या मदतीने दुसऱ्या प्रियकराला सरप्राइज गिफ्ट आणल्याचे सांगत डोळ्यावर पट्टी बांधून प्रेयसीने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला आहे. ही घटना भंडारा तालुक्यातील झिरी देवस्थानाच्या टेकडीवर घडली. याप्रकरणी प्रेयसीसह एका तरुणावर जवाहरनगर ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकुळ नामदेव वंजारी (22), रा. मौदी पहेला असे जखमी प्रियकराचे नाव आहे. वाचा - Love Triangle मुळे तरुणासोबत घडला भयानक प्रकार, गुगल मॅपमुळे झाला त्या थरारक घटनेचा खुलासा काय आहे घटना? भंडारा तालुक्यातील एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे नीरज पडोळे (24), रा. मानेगाव बाजार याच्यासोबत चार वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होतं. सगळंकाही सुरळीत सुरू असताना एक दिवशी गोकुळ वंजारी याची एंट्री झाली. पाच ते सहा महिन्यांपासून त्याचेही प्रेमप्रकरण सुरू होते. दरम्यान, गोकुळने नीरजची साथ सोड, असे आपल्या प्रेयसीला सांगितले. त्यावर तिने ही माहिती पहिला प्रियकर नीरज यास दिली. यानंतर दोघांनी मिळून गोकुळचा काटा काढण्याचा कट रचला. यानुसार गोकुळ यास जिल्ह्यातील झिरी देवस्थानच्या टेकडीवर बोलावले. यानंतर प्रियकराला कळू नये यासाठी सरप्राईज असल्याची बतावणी करुन त्याच्या डोळ्यांवर कापडी पट्टी बांधण्यात आली. यानंतर पहिला प्रियकर नीरज याने जवळ येत दुसरा प्रियकर गोकुळ याच्यावर धारदार कोयत्याने हल्ला केला. यामध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे. झिरी देवस्थानच्या टेकडीवर ही घटना घडली. याप्रकरणी प्रेयसीसह नीरज पडोळे याच्या विरुद्ध भादंवि 307, 34 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.