विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक, 2 मे : नाशिक जिल्ह्यामध्ये 2 वर्षांपूर्वी एक विवाह सोहळा पार पडला होता. त्या विवाह सोहळ्याची चर्चा राज्यभरात चांगलीच रंगली होती. तो विवाह सोहळा म्हणजे नाशिक जिल्ह्यातील येवल्याच्या संजय झाल्टे आणि मनमाडच्या शिवलक्ष्मी यांचा. त्याच कारण होत की येवल्याच्या संजय झाल्टे यांनी तृतीयपंथी शिवलक्ष्मी सोबत लग्नाची गाठ बांधली होती. त्यामुळे शिवलक्ष्मी एक तृतीयपंथी म्हणून काय संसार करणार म्हणून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. काहींनी तर संजय झाल्टे यांनी पैशांसाठी एका तृतीयपंथी सोबत लग्न केलं असावं असा ही आरोप केला होता. संजय झाल्टे आणि तृतीयपंथी शिवलक्ष्मी यांच्या लग्नाला आता 2 वर्षे पूर्ण झाली असून त्यांचा संसार कसा सुरू आहे जाणून घेऊया. कसा सुरु आहे संसार? संजय झाल्टे आणि मनमाडच्या शिवलक्ष्मी पण त्यांचं दोघांचं प्रेम होत. दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर जगण्याच्या आनाभाका घेतल्या होत्या आणि अखेर त्यांनी एका मंदिरात रितीरिवाजने लग्न केलं. संजयच्या घरच्यांनी ही आनंदान या दोघांना स्वीकारलं आणि आज त्यांच्या संसाराला 2 वर्षे झाली आहेत. गुण्या गोविंदाने एका महिलेला ही लाजवेल अशी शिवलक्ष्मी संसार करत आहेत.
सुखी संसाराला 2 वर्षे पूर्ण जो संसार 6 महिने टिकणार नाही. म्हणून अनेक जण बोलत होते. पण आज याच सुखी संसाराला 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे समाजाच्या सोबत राहून आम्ही ही आनंदाने 2 वर्षे पूर्ण केली आहेत. जेव्हा एखादी तृतीयपंथी माप ओलांडून घरात येते तेव्हा तिने सुखी संसाराची अनेक स्वप्न बघितलेली असतात आणि मी ही सर्व स्वप्न संजय सोबत बघतलेली आहेत आणि ती सर्व स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. यात माझे सासरे, सासू, दिर, नणंद, जाऊबाई यांचं सर्वांचं प्रेम मिळालं आहे. आम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहून संसार करायचा आहे. ज्यांनी आमच्यावर टीका केली त्यांना आम्ही आमच्या सुखी संसारामधून उत्तर देणार आहोत. आमचा हा सुखी संसार शेवटपर्यंत सुरू राहील, अशी प्रतिक्रिया शिवलक्ष्मी झाल्टे यांनी दिली आहे.
शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही एकत्र राहणार मी एका तृतीयपंथी सोबत लग्न केलं. समाजाने नाव ठेवलं हा संसार सहा महिने देखील टिकणार नाही असे अनेक जण बोलत होते. मात्र आम्ही आनंदाने 2 वर्षे पूर्ण केली आहेत. संसारात सुख, समाधान आणि आनंद हवा असतो. हे जर असेल तर संसार अगदी आनंदाने पुढे जात असतो. मला आणि शिवलक्ष्मीला समाजाला एक दाखवून द्यायचं आहे की आम्ही शेवटपर्यंत सोबत राहण्यासाठी हे लग्न केलं आहे, प्रतिक्रिया संजय झाल्टे यांनी दिली आहे.