मराठी बातम्या /बातम्या /heatlh /Keratin Rich Foods: या 4 पदार्थांमुळे केस गळतीवर बसेल लगाम, वजन कमी करण्यासाठीही होईल फायदा

Keratin Rich Foods: या 4 पदार्थांमुळे केस गळतीवर बसेल लगाम, वजन कमी करण्यासाठीही होईल फायदा

फायदे खूप असल्याने अनेक लोक सप्‍लीमेंट्स स्वरूपात केराटिन खातात. परंतु, त्याची गरज आपल्या घरातील आरोग्यदायी पदार्थांद्वारे देखील पूर्ण केली जाऊ शकते. जाणून घेऊया केराटिन समृद्ध (Keratin Rich Foods) आहाराबद्दल.

फायदे खूप असल्याने अनेक लोक सप्‍लीमेंट्स स्वरूपात केराटिन खातात. परंतु, त्याची गरज आपल्या घरातील आरोग्यदायी पदार्थांद्वारे देखील पूर्ण केली जाऊ शकते. जाणून घेऊया केराटिन समृद्ध (Keratin Rich Foods) आहाराबद्दल.

फायदे खूप असल्याने अनेक लोक सप्‍लीमेंट्स स्वरूपात केराटिन खातात. परंतु, त्याची गरज आपल्या घरातील आरोग्यदायी पदार्थांद्वारे देखील पूर्ण केली जाऊ शकते. जाणून घेऊया केराटिन समृद्ध (Keratin Rich Foods) आहाराबद्दल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Lanja, India

मुंबई 09 सप्टेंबर : अनेक लोकांना असं वाटतं की, केराटिन हे फक्त केसांशी संबंधित आहे. केराटिन हे एक प्रकारचे प्रथिन आहे जे केस, त्वचा आणि नखांमध्ये आढळते. हे प्रथिन त्वचेची रचना टिकवून ठेवण्यास मदत करते, जखम बरी करते आणि केस आणि नखे निरोगी बनवते. केसगळती रोखण्यासाठी, नखांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्वचा उजळ राखण्यासाठी केराटिन सप्लिमेंट्सचा वापर केला जातो. हे प्रोटीन शरीराला निरोगी बनवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते. यासाठी अनेक लोक सप्‍लीमेंट्स स्वरूपात केराटिन खातात. परंतु, त्याची गरज आपल्या घरातील अनेक आरोग्यदायी पदार्थांद्वारे देखील पूर्ण केली जाऊ शकते. जाणून घेऊया केराटिन समृद्ध (Keratin Rich Foods) आहाराबद्दल.

अंडी -

अंडी खाल्ल्याने नैसर्गिकरित्या केराटिन उत्पादनास चालना मिळते. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, बायोटिन हा केराटिनचा सर्वात मोठा स्रोत आहे. उकडलेल्या अंड्यामध्ये 10 mcg किंवा 33 टक्के दैनंदिन पोषक घटक असतात. याशिवाय एका अंड्यामध्ये 6 ग्रॅम प्रोटीन असते. अंडी नियमित सेवन केल्याने शरीराला सेलेनियम, रिबोफ्लेविन आणि जीवनसत्त्वे ए आणि बी सारखे पोषक घटक मिळू शकतात.

कांदा -

केसांच्या निरोगी वाढीसाठी अनेकजण कांद्याचा रस वापरतात. कांदा केवळ अन्नाला चविष्ट बनविण्यास मदत करत नाही तर केराटिन उत्पादनास चालना देण्यासही मदत करतो. ही एलियम भाजी अँटिऑक्सिडंट्सचा मुख्य स्त्रोत आहे. ती फक्त केसांसाठीच नाही तर शरीरासाठीही महत्त्वाची आहे.

सॅल्मन -

सॅल्मन फिशमध्ये केराटिन भरपूर प्रमाणात असते. हा बायोटिनचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. हा फिश खाण्यास जितका स्वादिष्ट असतो तितकेच त्याचे आरोग्यदायी फायदे आहेत. सॅल्मनमध्ये उच्च प्रथिने तसेच फायबर असतात जे पचनास मदत करतात. तसेच हृदय निरोगी ठेवण्याचे काम करतात.

हे वाचा - ताण-तणाव, चिंता कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत ही 5 ड्रिंक्स; ट्राय करून बघा

रताळी -

रताळ्यामुळे केराटिन उत्पादनास चालना मिळते. त्यामध्ये प्रोविटामिन ए कॅराडेनॉइड्सचे प्रमाण जास्त असते, जे शरीरातील संक्रमणांशी लढण्यास मदत करू शकते. रताळ्याचे सेवन त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरू शकते.

हे वाचा - डायबिटीजची लागण झाल्याचे कळल्याबरोबर आहारात करा असा बदल; वाढणार नाही शुगर

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Health, Health Tips