कोल्हापूर, 19 फेब्रुवारी : राज्यात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. दरम्यान शिवजयंती निमीत्त प्रत्येक जिल्ह्यात विवीध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही शिवभक्त शिवजयंती निमीत्त राज्यातील विवीध गडांवरून ज्योत आणण्यासाठी जात असतात. दरम्यान कोल्हापुरातील काही युवक जयंती निमीत्त ज्योत आणण्यासाठी गेले होते यावेळी दोन तरूणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
कोल्हापुरातील कदमवाडी, भोसलेवाडी परिसरातील युवकांचा शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या रजपुतवाडीजवळ अपघात झाला आहे. या अपघातात संतोष बाळासाहेब पाटील (वय 32, कदमवाडी) आणि अक्षय सुरेश पाडळकर (वय 24, भोसलेवाडी) या दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत दोघा युवकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर इथं आणण्यात आले आहेत. तर निलेश संकपाळ हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सीपीआर इथं दाखल करण्यात आले आहे.
हे ही वाचा : Shivjayanti 2023 : माझ्या राजाची जयंती आली..! शिवजयंतीनिमित्त WhatsApp स्टेटसला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश
शिवनेरी किल्ल्यावर संभाजीराजे संतापले
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा होत आहे. मात्र, शिवनेरीवर शिवप्रेमींना प्रवेश नाकारला आहे, त्यामुळे माजी खासदार संभाजीराजे नाराज झाले आहे. जोपर्यंत शिवप्रेमींना प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत मीही गडावर जाणार नाही, अशी भूमिकाच संभाजीराजेंनी घेतली.
शिवरायांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्म सोहळा साजरा होत आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थितीत आहे. राज्य सरकारच्या वतीने हा शासकीय सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यावेळी संभाजीराजे सुद्धा उपस्थितीत आहे.
हे ही वाचा : Shivjayanti 2023 : माझ्या राजाची जयंती आली..! शिवजयंतीनिमित्त WhatsApp स्टेटसला ठेवा सुंदर शुभेच्छा संदेश
मात्र, शिवनेरीवरील नियोजनाच्या अभावामुळे संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली. शिवनेरीवर शिवप्रेमींना प्रवेश नाकारला आहे, त्यामुळे माजी खासदार संभाजीराजे नाराज झाले आहे. जोपर्यंत शिवप्रेमींना प्रवेश दिला जात नाही, तोपर्यंत मीही गडावर जाणार नाही, अशी भूमिकाच संभाजीराजेंनी घेतली आहे.