अमित राय/कोल्हापूर : कोल्हापूरातील एका सात वर्षांच्या बाळाने महिलांच्या केसातील पिन गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. शस्त्रक्रियाद्वारे डॉक्टरांनी यशस्वीपणे ही पिन बाहेर काढली. बाळाला गिळताना आणि छातीत त्रास होऊ लागल्याने त्यांनी तात्काळ येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर एक्स-रे मध्ये बाळाने केसांतील पिन गिळल्याचे दिसून आले. त्यानंतर तत्काळ वेळ न घालवता डॉक्टरांनी दुर्बिणीद्वारे अन्न नलिकेतून ही पिन बाहेर काढली. जवळपास दीड सेंटीमीटर लांब ही पिन होती. सद्या बाळाची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. अनेकदा लहान मुलांकडे थोडंही दुर्लक्ष केलं तरी महागात पडू शकतं. त्यामुळे पालकांनी अधिक सजग राहणं आवश्यक आहे. सेल, पिन किंवा आकाराने लहान वस्तू लहान मुलांच्या आजूबाजूला ठेवणं टाळावं. काही मुलं नाणी देखील गिळल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सेलही गिळल्याच्या घटना समोर आल्या असून हे धोकादायक आहे. त्यातून अनर्थ घडू शकतो.
कोल्हापूरमध्ये मुले पळवल्याच्या अफवेनं खळबळ, पोलिसांनी थेट काढला आदेश
कोल्हापुरातील या घटनेत वेळेत बाळाला डॉक्टरांकडे नेल्याने त्याचा जीव बचावला आहे. त्याला गिळण्यास त्रास होत असल्याने याचा उलगडा झाला. एक्सरेमध्ये पिनचा आकारही दिसून येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.