मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोल्हापूरहून पुण्यात धडधडत्या हृदयाचा प्रवास! तब्बल 270 किमी अंतर अवघ्या 150 मिनिटांत पार केलं

कोल्हापूरहून पुण्यात धडधडत्या हृदयाचा प्रवास! तब्बल 270 किमी अंतर अवघ्या 150 मिनिटांत पार केलं

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

एका धडधडत्या हृदयाने कोल्हापूर-पुणे हे तब्बल 270 किमीचं अंतर अवघ्या 150 मिनिटांत पार केलं आहे.

पुणे, 26 एप्रिल :  150 मिनिटं म्हणजे फक्त अडीच तास. इतक्या वेळेत गाडीने ट्रॅफिकमुळे मुंबईतल्या मुंबईत फिरणंही किती मुश्किल आहे ते तुम्हाला माहितीच आहे. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाणंही मोठं आव्हानच. मग दोन जिल्ह्यातील अंतर इतक्या कमी वेळेत पार करणं हे अशक्यच. पण एका धडधडत्या हृदयाने मात्र कोल्हापूर-पुणे हे तब्बल 270 किमीचं अंतर अवघ्या 150 मिनिटांत पार केलं आहे (Pune heart transplant).

कोल्हापूरहून एक जिवंत हृदय पुण्यात आणण्यात आलं (Kolhapur Pune green corridor for heart transplant).  अवयवदान, अवयव प्रत्यारोपण याबाबत तुम्हाला आता माहिती असेलच. असंच अवयदान आणि अवयवप्रत्यारोपण पुणे आणि कोल्हापुरात झालं आहे (Pune organ transplant).

कोल्हापूरच्या देवळेतील 25 वर्षांचा तरुण. ज्याचा अपघात झाला. त्यानंतर त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या कुटुंबात त्याचे पालक आणि एक भाऊ आहे. त्यांनी त्याचे अवयव प्रत्यारोपण करण्याची परवानगी दिली. त्याचं यकृत आणि एक किडनी कोल्हापुरातील अॅस्टेर आधार रुग्णालयात देण्यात आली. तर दुसरी किडनी पुण्यातील पुणा रुग्णालयात पाठवण्यात आली. हृदय सह्याद्री हॉस्पिटलमधील रुग्णाला देण्यात आलं.

अवयवदान आणि अवयवप्रत्यारोपण यामध्ये सर्वात महत्त्वाची असते ती वेळ. एखादा अवयव शरीराबाहेर एका विशिष्ट वेळापर्यंतच कार्यरत राहतो. त्याआधी तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रत्यारोपित होणं महत्त्वाचं असतं. अशात कोल्हापूर, सातारा, सांगली हे जिल्हे पार करत पुण्यापर्यंत येणं म्हणजे मोठं आव्हान. पण सर्व जिल्ह्यांतील शहर आणि ग्रामीणच्या वाहतूक पोलिसांनीही हे आव्हान पेललं.

हे वाचा - Shocking! Energy drink पिताच 6 वर्षीय मुलाला आला Heart attack; चिमुकल्याचा मृत्यू

कोल्हापुरातील अवयवदान करणाऱ्या व्यक्तीच्या धडधडत्या हृदयाचा पुण्यात अवयव प्रत्यारोपणाची गरज असणाऱ्या रुग्णासाठी प्रवास सुरू झाला. वाहतूक पोलिसांनी ग्रीन कोरिडोअर करून दिला. ज्यामुळे हृदयाने तब्बल 270 किमीचं अंतर अवघ्या 150 मिनिटांत पार केलं. पुण्यातील या वर्षातील ही पहिली हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी आहे.

अवयवदान करणं हा आहे महत्त्वाचं?

भारतात अवयवदानाचं प्रमाण नेहमीच कमी राहिलं आहे. अंदाजानुसार, प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे स्पेनमध्ये 35 आणि अमेरिकेमध्ये 26 अवयवांचं दान केलं जातं. या तुलनेत भारतात हे प्रमाण केवळ 0.65 अवयव दान एवढं कमी आहे. भारतात केवळ 3 टक्के नोंदणीकृत अवयवदाते आहेत. साथीच्या आजारापूर्वीही भारतात अवयवदानाचं प्रमाण नेहमीच कमी होतं.

हे वाचा - प्रोस्टेट कॅन्सरच्या वाढीचं कारण आलं समोर, नव्या संशोधनामुळे उपचारात होणार मदत

2019 मध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 1.5-2 लाख लोकांना दरवर्षी मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. परंतु, केवळ 8,000 (4 टक्के) ते करतात. त्याचप्रमाणे दरवर्षी सुमारे 80,000 रुग्णांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते, परंतु त्यापैकी केवळ 1,800 प्रत्यारोपण होतं. त्याच वेळी, सुमारे 1 लाख रूग्णांना दरवर्षी कॉर्निया किंवा नेत्र प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. परंतु, अर्ध्याहून कमी रुग्णांना ते मिळतं. हृदयरोगींसाठी देखील, हृदय प्रत्यारोपणाची आवश्यकता असलेल्या 10,000 पैकी केवळ 200 दात्यांसोबत जुळतात.

First published:

Tags: Health, Kolhapur, Lifestyle, Organ donation, Pune, Pune Organ donation