साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 8 फेब्रुवारी : अगदी छोटासा जरी व्यवसाय करायचा असला, तरी त्याला योग्य मार्ग दर्शनाची गरज नक्कीच पडते. आणि जर योग्य पद्धतीने शिकून व्यवसायाला सुरुवात केली तर त्यात यश मिळतेच. अशाच पद्धतीने कोल्हापूर च्या एका गृहिणी महिलेने एका छोट्याशा प्रशिक्षणातून आपल्या घरगुती व्यवसायाला सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर त्यातून त्यांना चांगला नफा देखील मिळू लागला आहे. कविता किरण करजगार वय 45 कोल्हापूरच्या साळोखेनगर परिसरातील रहिवासी आहेत. 2020 मध्ये त्यांनी एक सरकारी कोर्स पूर्ण केला होता. महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षणाचा हा कोर्स त्यांच्याबरोबर जवळपास 60 जणींनी केला होता. या कोर्समधील शिक्षणाचा फायदा घेत फक्त मीच असा स्वतःचा छोटेखानी व्यवसाय केला आहे, असे कविता सांगतात.
वेगवेगळ्या पद्धतीने हे हर्बल प्रोडक्ट बनवताना कविता यांनी योग्य असे तंत्र शिकून घेतले आहे. त्यामुळे या वस्तू त्यांना आता बनवणे सोपे जाऊ लागले आहे. एखादा साबण बनवताना एका भांड्यात साबणाचा बेस चुरा करुन घेतला जातो. इलेक्ट्रिक शेगडीवर हा बेस वितळवून घेऊन, त्यामध्ये योग्य ते सर्व घटक मिसळले जातात. मग रबरी मोल्ड मध्ये मिश्रण ओतून ते थंड होऊ दिले जाते. थंड झाल्यावर हा साबण तयार होतो. मग त्याला व्यवस्थित पॅकिंग करून तो विक्रीसाठी ठेवला जातो, अशी माहिती कविता यांनी दिली आहे. लाखोंची कमाई घाबरत घाबरतच सुरू केलेला हा कविता यांचा व्यवसाय आता जोर धरू लागला आहे. सुरुवात केल्यावर त्यांचे प्रोडक्ट त्यांनी कोल्हापूर शहरातील किराणा दुकाने, मित्रमंडळी यांच्याकडे आणि आयुर्वेदिक दुकाने, पार्लर यांच्याकडे विकले होते. मात्र, आता बऱ्याच महिला स्वतः विकत घेऊन पुढे विकण्यासाठी घेऊन जातात. कविता यांच्या व्यवसायात सध्या 60-70 टक्के रीसेलर आहेत. त्यामुळे कविता यांचा दरवर्षीचा टर्न ओव्हर एक ते दीड लाख रुपयांचा बनला आहे. त्याच बरोबर 2020 पासून त्यांनी अंदाजे 5 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे.
Success Story : स्पर्धा परीक्षेचा नाद सोडला आणि आयुष्यात चहानं आणला गोडवा! पाहा Videoकुठे कुठे जातात वस्तू ? कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली, सातारा, कराड, सोलापूर, पुणे यासह कर्नाटकातील निपाणी, बेळगाव, बेंगलोर इथे देखील कविता यांचे प्रोडक्ट जातात. तर हैदराबाद, गुजरात या ठिकाणी देखील साबण, शाम्पू तेल आदी विकले गेले आहेत, असे कविता यांनी सांगितले. फेशियल बॉम्ब स्वतःचा प्रोडक्ट बऱ्याच वेळी आपल्याला फेशियल करण्यासाठी पार्लरमध्ये जावे लागते. पण ते खूप खर्चिक आणि वेळ खाऊपण असते. त्यावरच उपाय म्हणून फेशियल बॉम्ब असा साबण कविता यांनी बनवला आहे. या साबणाने फेशियल सारखा चेहरा होतो असा दावा देखील त्यांनी केला आहे.
Video : नोकरी गेली तरी मानली नाही हार, मुंबईच्या तरुणानं अमरावतीत उभारला व्यवसाय
पत्ता मोरे माने नगर, साळोखेनगर पाण्याच्या टाकीजवळ, कोल्हापूर संपर्क (कविता करजगार) : +91 9890230259