जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूरच्या हॉटेलचा नाद खुळा! वेटरच्या जागी काम करतात चक्क रोबो, Video

कोल्हापूरच्या हॉटेलचा नाद खुळा! वेटरच्या जागी काम करतात चक्क रोबो, Video

कोल्हापूरच्या हॉटेलचा नाद खुळा! वेटरच्या जागी काम करतात चक्क रोबो, Video

कोल्हापुरातील शिवाजी उद्यम नगरमध्ये इडली स्क्वेअर या हॉटेलमध्ये वेटर ऐवजी चक्क चार लाखांचे रोबो ग्राहकांना खाद्यपदार्थ देण्याची सर्विस देत आहेत.

  • -MIN READ Local18 Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    कोल्हापूर, 25 नोव्हेंबर : एखाद्या हॉटेलमध्ये आपली ऑर्डर एक वेटर लिहून घेतो आणि त्यानुसार तो पदार्थ आणून देतो. असं सर्वसाधारण चित्र आपल्याला माहित आहे. पण, आपण हॉटेलमध्ये जातोय आणि आपल्यासमोर चक्क रोबो येऊन उभा राहतो, तो आपली ऑर्डर घेतो आणि तो पदार्थ आपल्यापर्यंत आणून देखील देतो, असं सगळं झालं तर..? हे एखाद्या सिनेमात नाही तर कोल्हापूरच्या एका हॉटेलमध्ये घडतंय. या हॉटेलमध्ये वेटर म्हणून चार लाख रुपयांचे चक्क रोबो काम करतात. काय आहे कल्पना? कोल्हापुरातील शिवाजी उद्यम नगरमध्ये इडली स्क्वेअर या हॉटेलमध्ये वेटर ऐवजी चक्क रोबो ग्राहकांना खाद्यपदार्थ देण्याची सर्विस देत आहेत. याचवर्षी  या हॉटेलची सुरुवात झाली आहे. या हॉटेलमध्ये साऊथ इंडियन डिशेस त्याचबरोबर पावभाजी, चहा, कॉफी, मिल्कशेक्स हे पदार्थ मिळतात. या हॉटेलचे मालक महेश बुधले यांना ही संकल्पना सुचली होती. ग्राहकांसाठी हॉटेलमध्ये काहीतरी वेगळेपण आणण्याची त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी तैवानच्या एका कंपनीकडू हे रोबो मागवले. हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपल्याला टी.व्ही. स्क्रीनवर हॉटेल मध्ये मिळणारे पदार्थ दिसत असतात. त्यापैकी आपल्याला हवा तो पदार्थ आपण हॉटेल मॅनेजरला सांगून मागवू शकतो. मग आपली डिश रेडी झाली, की एक रोबो ती डिश घेऊन आपल्यासमोर उभा राहतो. ती डिश घेण्यासाठी तो रोबो सांगतो. डिश घेतल्यानंतर रोबोचे एक्झीट बटन आपण दाबल्यावर तो परत जातो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    ग्राहकांना आकर्षण वाटावं म्हणून आम्ही हे रोबो वेटरच्या जागी मागवले आहेत. इडली स्क्वेअर हे रोबो सर्व्हिस देणारे पश्र्चिम महाराष्ट्रात पहिलेच हॉटेल आहे. प्रत्येकी चार-चार लाखांचे 2 रोबो आम्ही तैवानवरून मागवले आहेत. त्यांना योग्य ते प्रोग्रामिंग केले आहे. ज्या टेबलवर जाऊन थांबायचे त्या टेबलचा नंबर प्रेस केला की बरोबर त्या टेबलपर्यंत हा रोबो जाऊन थांबतो. त्यासाठी मग्नेटीक स्ट्रिप्स हॉटेल बसवून एक रॅम्प तयार करण्यात आलेला आहे, असे हॉटेलचे मालक महेश बुधले यांनी सांगितले. मातीच्या भांड्यामधे बनवलेली कोल्हापूरच्या रांगड्या चवीची मिसळ, Video रोबोंना आहेत नावे.. इडली स्क्वेअर हॉटेलमध्ये रोबो मार्फत खाद्यपदार्थ मागवणे, हे वेगळेपण ग्राहकांना आवडत आहे. त्यामुळेच या रोबोंना नावे देण्यात आली आहेत. या रोबोची फिमेल रोबो सारखी रचना असल्यामुळे कॅट्टी आणि मॅट्टी अशी या रोबोंची नावे ठेवण्यात आली आहेत. या रोबोंना ग्राहकांना सूचना देण्यासाठी प्री-रेकॉर्डेड सेट करण्यात आला आहे. यातही त्यांच्या नावाप्रमाणेच महिलेचा आवाज सेट करण्यात आला आहे. चौकनी खाद्यपदार्थ या हॉटेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील जवळपास सर्व खाद्यपदार्थ चौकोनी आकारात आहेत. सामान्यतः इडली, उडीद वडा, उत्ताप्पा किंवा डोसा हे आपल्याला गोल आकाराचे बघायला मिळतात. पण या हॉटेलमध्ये हे सर्व पदार्थ चौकोनी आकारात उपलब्ध आहेत. उसळ नसलेल्या मिसळीचा घ्या स्वाद, काळ्या तिखटाची चव आहे खास video गुगल मॅपवरून साभार हॉटेलचा पत्ता हॉटेल इडली स्क्वेअर, 1243, लक्ष्मी आईस फॅक्टरी जवळ, ई वॉर्ड, शिवाजी उद्यम नगर, कोल्हापूर - 416008 महेश बुधले - +919371101132

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात