जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कोल्हापूर हादरलं! मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा खून, शॉक लागल्याचा केला बनाव

कोल्हापूर हादरलं! मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा खून, शॉक लागल्याचा केला बनाव

मृत महिला

मृत महिला

एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव सरकार असे अभियान राबवत राज्यातील कोल्हापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 28 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान, एकीकडे बेटी बचाव बेटी पढाव सरकार असे अभियान राबवत राज्यातील कोल्हापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोल्हापुरात मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा खून करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - कोल्हापुरात मुलाच्या हव्यासापोटी पत्नीचा खून करण्यात आला आहे. करवीर तालुक्यातील दोनवडे येथील या घटनेने खळबळ उडाली आहे. पतीने पत्नीची हत्या करुन विजेचा शॉक लागल्याचा बनाव केला होता. दोन मुली झाल्याने पत्नीचा पतीकडून छळ सुरू होता. अखेर पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. आश्विनी एकनाथ पाटील यांचा मारहाणीत मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पती एकनाथ पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. करवीर तालुक्यातील दोनवडे येथे कौटुंबिक वादातून पतीने दोरीच्या साहाय्याने गळा आवळून पत्नीचा खून केला. अश्विनी एकनाथ पाटील (वय 28) असे या विवाहितेचे नाव आहे. आज पहाटे हा प्रकार घडला आहे. अश्विनीच्या माहेरच्या नातेवाईकांनी पती एकनाथ याने अश्विनीचा खून केल्याची तक्रार दिल्याने पोलिसांनी पती एकनाथ याला ताब्यात घेतले आहे. करवीर पोलिसांनी एकनाथची कसून चौकशी केली असता एकनाथने अश्विनीच्या दोरीच्या साहाय्याने गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. या घटनेने कोल्हापूर हादरले आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पुणे : मुलगी झाली अन् आईचं भयानक कृत्य पुण्यातही काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली होती. मुलीला जन्म दिल्यानंतर तिला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडण्यात आले होते. याप्रकरणी आरोपी आईला CCTV च्या आधारे मंचर पोलिसांनी तीन तासांत पकडले. आईपणाच्या नात्याला काळिमा फसणारी घटना आंबेगाव तालुक्यातील मंचर शहरात घडली. जन्म देताच पोटच्या गोळ्याला आईनेच क्षणात अनाथ करत कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर सोडले. नवजात बालिका नकोशी झालेल्या जन्मदात्या आईचा शोध घेऊन CCTV च्या आधारे तीन तासांत मंचर पोलिसांनी तिला अटक केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात