जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बाजारातील असंख्य आंब्यांमध्ये 'हापूस' कसा ओळखणार? 'या' पद्धतीनं टाळा फसवणूक, Video

बाजारातील असंख्य आंब्यांमध्ये 'हापूस' कसा ओळखणार? 'या' पद्धतीनं टाळा फसवणूक, Video

बाजारातील असंख्य आंब्यांमध्ये 'हापूस' कसा ओळखणार? 'या' पद्धतीनं टाळा फसवणूक, Video

बाजारात सध्या अनेक प्रकारचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सर्वांच्या गर्दीत हापूस आंबा कसा ओळखावा? त्याची पद्धत पाहा.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 7 एप्रिल : हिवाळा संपला की सर्वांना फाळांचा राजा आंब्याचे वेध लागतात. देशभरात आंब्यांच्या अनेक जातीची लागवड केली जाते. पण, यामधील हापूस आंबा सर्वात फेमस आहे. कोकणातील हापूस आंब्याला जगभरातून मोठी मागणी असते. बाजारात दिसणारा प्रत्येक पिवसर आंबा हा हापूसच आहे, अशी अनेक ग्राहकांची समजूत असते. अस्सल हापूस आंबा कसा ओळखावा याबाबत गेल्या 4 पिढ्यांपासून आब्यांचा व्यापार करणाऱ्या कोल्हापूरच्या प्रसाद वळूंजू यांनी खास टिप्स दिल्या आहेत. कसा ओळखाल अस्सल हापूस? ग्राहक मुख्यतः पिकलेला आंबा विकत घ्यायला बाजारात जातात. मात्र बाजारपेठेत वाढलेल्या स्पर्धेमुळे बऱ्याचदा ग्राहकांची फसवणूक होत असते. एखाद्या आंब्याला असलेल्या दरापेक्षा जास्त दर मिळावा, यासाठी विक्रेत्यांकडून ही फसवणूक केली जाते. तर ग्राहकालाही त्यातील फारसे ज्ञान नसल्यामुळे त्यांची नकळत फसवणूक होते.त्यावेळी तुम्ही अगदी मोजक्या निकषाच्या आधारावर फसवणूक रोखू शकता.

    News18लोकमत
    News18लोकमत

    देवगडचा आंबा हा डोंगरी भागातून आलेला असतो. त्या प्रदेशात असणाऱ्या जास्त ऊन्हामुळे या आंब्याला वरच्या बाजूला लालसर रंग प्राप्त झालेला असतो. यावरून हा आंबा डोंगरी भागातून येणारा ओरिजनल देवगडचा आंबा आहे, हे लक्षात येऊ शकते. बाहेर असणाऱ्या केशरी रंगा प्रमाणेच आंबा कापून आतला रंग पाहिला, तर तो देखील केशरीच पाहायला मिळतो. रत्नागिरीचा आंबा हा वरच्या बाजूनं जास्त केशरी रंगाचा असतो. तो आतमध्येही केशरीच पाहायला मिळतो. हा आंबा पिकल्याव वरच्या बाजूला सुरकुत्या दिसतात, अशी माहिती प्रसाद यांनी दिली. हापूस आणि मलावी आंब्यातील फरक तुम्हाला माहिती आहे का? ‘कर्नाटक आणि तामिळनाडू या ठिकाणी पिकवलेला आंबा हा कधीच वासाचा नसतो. त्याचबरोबर या आंब्याचा रंग आतून पिवळा असतो. तसेच या आंब्याची साल देखील हापूस आंब्याच्या तुलनेत जाड असते. हापुस आंब्याची साल ही पातळच असायला हवी. कोकणात पिकवलेला आंबा हा आतून केशरीच असतो. ज्यावेळी एखादा ग्राहक आंबा विकत घेत असेल, तेव्हा विक्रेत्याला आंबा कापून देण्यास सांगू शकतो. हापूस आंब्याचा वास देखील अत्यंत चांगला असतो. तर वासाबरोबरच चवीला गोड अशी हापूस आंब्याची खासियत आहे,’ असे देखील प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले. वर्षातून काही महिनेच आंबा खायला मिळतो. तो खाताना देखील आपली फसवणूक होऊ नये, यासाठी या सोप्या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपली होणारी फसवणूक थांबू शकतो.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात