मुंबई, 3 जानेवारी : फळांचा राजा आंबा हे सर्वांचेच आवडते फळ आहे. आंब्यांच्या वेगवेगळ्या जाती जगभर आहेत. त्यापैकी कोकणातील हापूस आंबा हा सर्वात प्रसिद्ध आहे. हापूस आंबा एकदा खाल्ला की त्याची चव बराच काळ जीभेवर राहते. त्यामुळे हापूसप्रेमी दरवर्षी हा उन्हाळ्याची आतुरतेनं वाट पाहात असतात. मुंबईतील बाजारामध्ये काही दिवसांपूर्वी मलावी आंबा आला होता. हिवाळ्यात मिळणारा हा आंबा काही जणांना हापूससारखाच वाटला. पण, हापूस आणि मलावी आंब्यामध्ये मोठा फरक आहे. काय आहे फरक? मलावी देशाची लोकसंख्या दीड कोटींच्या आसपास आहे. तेथील हवामान कोकणासारखेच आहे. 2011 साली मलावीतील काही शेतकऱ्यांनी भारतात येऊन कोकणातून आंब्याची कलमं नेली होती. ही कलमं त्यांनी तिकडच्या मातीत रुजवली जवळपास ४५० एकर जमिनीवर आंब्याची आमराई फुलवली. दरवर्षी 15 नोव्हेंबरपर्यंत या आंब्याची आवक होते. गेल्या वर्षी 15 नोव्हेंबरलाच हा आंबा महाराष्ट्रात दाखल झाला होता. मालावी देशात आंब्याचा हंगाम ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये असतो. Beed : पारंपरिक गुऱ्हाळ घरं का बंद पडत आहेत? वाचा प्रमुख कारणं कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्था मर्यादित रत्नागिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार,‘कोकण विभागातील पाच जिल्ह्यांमधील हापूस या नावाने भौगोलिक निर्देशन (जीआय) मिळाला आहे. या पाच जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या आंब्या व्यक्तिरिक्त इतर ठिकाणच्या आंब्याला आणि आंब्यापासून बनविलेल्या पदार्थांचा उल्लेख हापूस या नावानं करता येणार नाही.’
कोकण प्रांतामधील हापूसची चव, रंग, पौष्टीकता वगैरे गोष्टी या भौगोलिकतेमुळे वेगळ्या आहेत. हापुस आंबा फक्त कोकणातच तयार होतो त्यामुळे अन्य कोणत्याही प्रत असूच शकत नाही व त्याची कोणाशीही स्पर्धा होऊ शकत नाही.