मुंबई, 11 ऑगस्ट : कोल्हापूर जिल्ह्याचे श्रावण बाळ म्हणून ओळखले जाणरे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईतील आपला बंगला सोडला. मंत्रीपद मिळाल्यानंतर त्यांना हा बंगला देण्यात आला होता. (Hasan Mushrif) परंतु ते मंत्रीपद काळात या बंगल्याचा कधीच वापर करत नसत. कारण राज्यातील विविध भागातून मुंबईला कामासाठी येणाऱ्या लोकांना ते हा बंगला निवारा म्हणून देत असत. महाविकास आघाडीसरकार कोसळल्यानंतर त्यांना त्यांचा बंगला खाली करावा लागत असल्याने राज्यातील रुग्णांना आता आधार कोणत्या बंगल्याचा हाच प्रश्न पडल्याने रुग्णांनी काल त्यांचा बंगला सोडताना जड अंत:करण केले.
रुग्णांच्या हक्काचे घर समजला जाणारा मुंबईतील हसन मुश्रीफ यांचा सरकारी बंगला मुश्रीफ यांनी सत्ता जाताच खाली केला. त्यामुळे अनेक रुग्णांनी जड अंतःकरणाने हा बंगला खाली केला. मुश्रीफ यांना मंत्री पदाचा सरकारी बंगला मिळाला असला तरी ते त्याचा वापर स्वतः न करता राज्यातून मुंबईत येणाऱ्या रुग्णांना आणि नातेवाईकांना देत होते. त्यामुळे त्यांचा हा बंगला आधार ठरत होता. मात्र मुश्रीफ यांनी तो सोडल्याने रुग्णांनाही तिथून बाहरे पडावे लागले. मुश्रीफ यांचा जड अंतःकरणने निरोप घेत रुग्ण बाहेर पडले.
हे ही वाचा : शपथ झाली पण खातेवाटपाला ब्रेक, मंत्र्यांनी मागितले तीन ऑप्शन!
राज्यातील विविध भागातून येणाऱ्या लोकांना मंत्रीपद काळात हसन मुश्रीफ यांनी आरोग्यसुविधा पुरवली आहे. हसन मुश्रीफ म्हणजे राज्यातील आरोग्यदुतच म्हणून ओळखले जातात. मुश्रीफांच्या या कामामुळेच त्यांना कोल्हापूर जिल्ह्याचा श्रावण बाळ म्हणून ओळखले जाते. गोरगरिबांसाठी मोफत आरोग्य सुविधा घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना त्यांनी मुंबईतील आपला बंगला रिकामा ठेवला होता. परंतु त्यांना हा बंगला खाली करावा लागल्याने रुग्णांना आणि नातेवाईकांना अश्रू अनावर झाले.
करोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील गरीब रुग्ण शहरांमध्ये उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील धर्मादाय रुग्णालयांमध्ये नियमाप्रमाणे दहा टक्के गरीब रुग्णांना मोफत उपचार द्यावे, असे स्पष्ट निर्देश माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ काढले होते. दरम्यान या आदेशामुळे लाखो लोकांना मोफत उपचार मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
हे ही वाचा : फडणवीसांपाठोपाठ शिंदेंच्या विधानाने सस्पेन्स वाढला, मत्रिमंडळाचा विस्तार झाला, पण खातेवाटपाचं काय?
मागच्या 15 ते 20 वर्षांत मी लाखो रुग्णांना मोठ्या रुग्णालयात उपचार देऊन त्यांच्या घरी सोडत आलो आहे. हे माझ्यासाठी नवीन नाही पण हा बंगला सोडताना रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी मी काळजी घेणार आहे. मी यापुढेही असेच काम करत राहिन असेही ते म्हणाले. मोठ्या उद्योगपतींचे रुग्णालये असल्याने गरिबरुग्णांना या रुग्णालयात उपचार घेण्यास अडथळे निर्माण होत होते यासाठी विशेष कायदा करून आम्ही गरीब रुग्णांना उपचार देण्यासाठी विशेष कक्ष तयार केल्याचेही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.