मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /संपूर्ण कोल्हापूर फिरलात तरी असे कबाब आणि चाट मिळणार नाही! पाहा Video

संपूर्ण कोल्हापूर फिरलात तरी असे कबाब आणि चाट मिळणार नाही! पाहा Video

X
Kolhapur

Kolhapur : वेगवेगळ्या 10 प्रकारचे चाट, 4 प्रकारचे कबाब आणि 5 प्रकारच्या भेळ इथे तुम्हाला खायला मिळतील.

Kolhapur : वेगवेगळ्या 10 प्रकारचे चाट, 4 प्रकारचे कबाब आणि 5 प्रकारच्या भेळ इथे तुम्हाला खायला मिळतील.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Kolhapur, India

    कोल्हापूर, 5 नोव्हेंबर :  टोफू चाट, ड्रायफ्रूट चाट, ब्रोकोली चाट, बनारस पान चाट.. ही सगळी नावे कदाचित तुम्ही कधी ऐकली नसतील.. पण अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चाट आणि कबाब सध्या कोल्हापुरात मिळत आहेत. कोल्हापुरातील प्रतिभा नगर परिसरात असणाऱ्या रेड्याचा तक्करी जवळ जय अंबे चाट आहे. वेगवेगळ्या 10 प्रकारचे चाट, 4 प्रकारचे कबाब आणि 5 प्रकारच्या भेळ इथे आपल्याला खायला मिळतात.

    एका गाड्यापासून सुरूवात

    सागर कोरे या अस्सल कोल्हापुरी तरूणाने सात वर्षांपूर्वी  जय अंबे चाट सुरू केले होते. सुरुवातीला एका छोट्या गाड्यावर त्याचा व्यवसाय सुरू होता. पदार्थांचे वेगळेपण, लज्जतदार चव आणि मेहनतीच्या जोरावर कोरे यांनी या गाड्याचे रूपांतर एका मोठ्या कॅफेमध्ये केले. यानंतर या कॅफेची दुसरी शाखा त्यांनी कोल्हापूर आरटीओ ऑफिस जवळ, ताराबाई पार्क येथे सुरू केली, अशी माहिती प्रतिभानगर येथील जय अंबे कॅफेचे मॅनेजर मंथन सावंत यांनी दिली.

    काय आहे स्पेशालिटी ?

    जय अंबे चाट या कॅफेची स्पेशालिटी म्हणजे इथे मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची स्पेशल चाट. या चाट मधील टोफू चाट आणि ब्रोकोली चाट याला ग्राहकांकडून जास्त मागणी असते. सोयापासून बनवलेल्या पदार्थाला टोफू म्हणतात. पनीर आणि टोफू हे सामान्यतः सारखेच दिसतात पण दोन्हींची चव वेगळी असते. या दोन पदार्थांबरोबरच बाकीचे चाट आणि कबाब देखील खवय्यांच्या पसंतीस उतरलेत.

    कबाबही लोकप्रिय 

    स्पेशल चाट बरोबरच याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कबाबना जास्त मागणी असते. यामध्ये मश्रुम कबाब, बेबी सिगार, ब्रोकोली कबाब, टोफू चिली मिली अशा प्रकारच्या कबाबचा समावेश आहे.

    सोशल मीडियावर वेगळ्या प्रकारचे चाट आणि कबाब मिळण्याचे ठिकाण म्हणून जय अंबे प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे त्याद्वारे देखील बरेचसे खवय्ये येथे येऊन या फ्युजन डिशचा आस्वाद घेत असतात. अशाच प्रकारे या ठिकाणची खाल्लेली नवीन चाट ही अप्रतिम असल्याची प्रतिक्रिया अमन मुजावर यांनी दिली.

    कोल्हापुरी लड्डू पान लय भारी! काय आहे खासीयत पाहा VIDEO

    मनमोहक इंटेरियर, खास व्हरायटी आणि वेगळी टेस्ट अशा कॉम्बिनेशन मुळे जय अंबे बरेच प्रसिद्ध झाले आहे. कोल्हापुरात फक्त याच ठिकाणी आपल्याला हे वेगवेगळे पदार्थ चाखायला मिळतात. त्यामुळे काहीतर वेगळं खायची इच्छा झाली की खवय्यांची पाऊले आपसूकच या ठिकाणी यायला वळतात.

    गुगल मॅपवरून साभार

    कुठे खाणार चाट ?

    १) जय अंबे चाट, रेड्याच्या टक्करी जवळ, प्रतिभानगर मेन रोड, कोल्हापूर - ४१६००८

    २) जय अंबे चाट, आरटीओ ऑफिसच्या समोर, ई वॉर्ड, ताराबाई पार्क, कोल्हापूर - ४१६००३

    सागर कोरे : +91 8180955357

    First published:

    Tags: Food, Kolhapur, Local18, Local18 food