मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महाप्रसादाच्या कार्यक्रमात गोळीबार, गणेशोत्सवाला गालबोट, धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं

महाप्रसादाच्या कार्यक्रमात गोळीबार, गणेशोत्सवाला गालबोट, धक्कादायक घटनेने कोल्हापूर हादरलं

घटनास्थळावरचा फोटो

घटनास्थळावरचा फोटो

कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवनिमित्त आयोजित महाप्रसादावेळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.

  • Published by:  Chetan Patil
१ज्ञानेश्वर साळोखे, कोल्हापूर, 3 सप्टेंबर : कोल्हापूरमध्ये गणेशोत्सवनिमित्त आयोजित महाप्रसादावेळी गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. जेवणाच्या पंगतीत मानाने पाणी सोडण्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत 5 जण गंभीर जखमी झाले. यावेळी एकाने गोळीबार करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. हाणामारीदरम्यान काठ्या, दगडांचा वापर केला गेला. गोळीबार करणाऱ्या 12 जणांच्यावर गुन्हा नोंद झालाय. तर 10 जणांना अटक करण्यात आलीय. संबंधित घटना ही कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील मांडरे गावात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गावात अतिशय भयानक राडा झालाय. या राड्यामुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेनंतर गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या घटनेप्रकरणी दहा जणांना अटक केली आहे. तर बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे. नेमकं काय घडलं? सबंधित घटना ही शुक्रवारी (2 सप्टेंबर) संध्याकाळी घडली. मांडरे गावात हनुमान तरुण मंडळाकडून शुक्रवारी संध्याकाळी गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गोंधळ झाला. अगरबत्ती लावून, पंक्तीत मानाने हातावरुन पाणी सोडून जेवणाला सुरुवात होणार होती. पण मानाने पाणी सोडण्यावरुन दोन गट समरोसमोर आले. यावेळी दोन्ही गटामध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीत लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आला. त्यानंतर एकाने थेट हवेत गोळीबार करत खळबळ उडवून दिली. (मुंबईतील सर्वात मोठी बातमी! वांद्र्यात लपून बसलेल्या संशयित दहशतवाद्याला बेड्या, मोठा घातपात घडवण्याचा होता कट?) संबंधित घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेचं गांभीर्य ओळखून करवीर पोलीस ठाण्याचे उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी स्वत: घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती मिळवली. त्यानंतर संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात आला. काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर गावत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला.
First published:

Tags: Crime, Gun firing, Kolhapur

पुढील बातम्या