जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Eid Festival 2023 : मेहंदीपासून शेवयांपर्यंत ईदसाठीच्या सर्व वस्तूंची 'इथं' करा खरेदी, पाहा Video

Eid Festival 2023 : मेहंदीपासून शेवयांपर्यंत ईदसाठीच्या सर्व वस्तूंची 'इथं' करा खरेदी, पाहा Video

Eid Festival 2023 : मेहंदीपासून शेवयांपर्यंत ईदसाठीच्या सर्व वस्तूंची 'इथं' करा खरेदी, पाहा Video

कोल्हापुरात ईद फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. ईद सणानिमित्त लागणारे छोट्यातल्या छोट्या वस्तू या ठिकाणी खरेदी करू शकता.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    साईप्रसाद महेंद्रकर, प्रतिनिधी कोल्हापूर, 19 एप्रिल : मुस्लीम बांधवांसाठी रमजानचा महिना आणि रमजान ईद अत्यंत पवित्र असतात. त्याचबरोबर रमजान ईद ही सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जाते. हाच आनंद द्विगुणित करण्यासाठी कोल्हापुरात रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर 18 तारखेपासून ते रमजान ईद साजरी होईपर्यंत ईद फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक या ठिकाणी दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या ईद फेस्टीव्हलचे उद्घाटन माजी महापौर आर. के. पोवार, निलोफर आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी पार पडले. ईद सणानिमित्त लागणारे छोट्यातल्या छोट्या वस्तूपासून सर्व काही या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गेल्या जवळपास 25 वर्षांपूर्वी गणी आजरेकर यांनी हा ईद फेस्टीव्हल कोल्हापुरात सुरु केला. तेव्हापासून दरवर्षी असा हा ईद फेस्टीव्हल आयोजित करण्यात येत आहे. ‘ना नफा ना तोटा‘ या संकल्पनेवर आधारित वस्तू विक्रीचा हा फेस्टीव्हल असतो.

    News18लोकमत
    News18लोकमत

    खरेदीसाठी गर्दी  ईद हा अमीर आणि गरीब दोघांनी साजरा करण्याचा सण आहे. या ईद फेस्टीव्हलमध्ये चैनीच्या कोणत्याही वस्तू विक्रीला नाही आहेत. तसेच सर्व लागणाऱ्या गरजेच्या वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी हा ईद फेस्टीव्हल आयोजित केला जातो. या फेस्टीव्हलमुळे संपूर्ण कोल्हापुरातील हिंदू आणि मुस्लिम बांधव खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी करत असतात. त्यामुळे 18 तारखेपासून सुरु झालेला हा फेस्टीव्हल ईद होईपर्यंत हा फेस्टीव्हल सुरू राहणार असल्याचे असा ईद फेस्टीव्हल कोल्हापुरात सुरु करणारे आयोजक गणी आजरेकर यांनी सांगितले आहे. काय काय आहे विक्रीला? या फेस्टीव्हलमध्ये ईदसाठी लागणारे सर्व अत्यावश्यक घटक विक्रीसाठी आहेत. त्यामध्ये ड्रायफ्रूट, शेवया, मेहंदी, इमिटेशन ज्वेलरी, क्रॉकरी, कच्ची भाजी, महिलांसाठी खास मेहंदी, बांगड्या, इंमिटेशन ज्वेलरी, लहान मुलांची खेळणी अशा प्रकारचे सर्व साहित्य यानिमित्ताने एकाच छताखाली उपलब्ध करून दिले आहे. असे या ईद फेस्टीव्हलमध्ये एकूण 110 स्टॉल्स आहेत. तर फक्त शंभर रुपयांत दहा किलो ठेवणीचा कांदाही येथे उपलब्ध करण्यात आला आहे, असे गणी आजरेकर यांनी सांगितले.

    Ramdan 2023 : रमजान महिन्यातील शब-ए-कद्रच्या रात्रीचं काय आहे महत्व? पाहा Video  

    मोफत पिण्याच्या पाण्याची सोय रमजान महिना आणि ईद या सणाचे औचित्य साधून दिनांक 13 एप्रिलपासून बिंदू चौक याठिकाणी मोफत शुद्ध आणि थंड पाणी देण्यात येत आहे. दिनांक 22 एप्रिल पर्यंत याचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे. दरम्यान या ईद फेस्टिवल 2023 चा सर्व हिंदू-मुस्लीम बांधवानी लाभ घ्यावा, असे आवाहन समितीचे अध्यक्ष शौकत बागवान आणि गणी आजरेकर यांनी केले आहे. कुठं कराल खरेदी? पत्ता : बिंदू चौक पार्किंग, कोल्हापूर - 416002

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात