विठ्ठल भाडमुखे,प्रतिनिधी नाशिक 19 एप्रिल : मुस्लीम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. आता सर्वांनाच ईदचे वेध लागले आहेत. येत्या शुक्रवारी चंद्रदर्शन घडण्याची शक्यता आहे. त्यानंतर ईद सण साजरा होईल. रमजान महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात शब-ए-कद्रची रात्र साजरी केली जाते. नाशिकमध्ये या निमित्तानं मशिदीमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काय आहे या विशेष रात्रीचं महत्त्व पाहूया… काय आहे महत्त्व? या रात्रीला विशेष महत्त्व असल्याने मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.या रात्री धर्मग्रंथ कुराण संपूर्णतः पृथ्वीतलावर अवतरित झाल्याची अख्यायिका सांगितली जाते.कद्र शब्दाचा अर्थ आदर, सन्मान,असावा ही रात्र एक हजार रात्रीपेंक्षा महत्वाची रात्र आहे, असं मानण्यात येतं.
या दिवशी जे संकटात आहेत त्यांना मदत करा. त्यांच्यावरी संकट कमी करा. कोणत्याही प्रकारची मदत लागत असेल तर सर्वांनी मिळून त्या व्यक्तीला मदत करा, ’ अशी प्रतिक्रिया मौलाना करीम रजा यांनी दिली आहे. मुंब्र्याची ट्रॅफिक गर्ल! वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तरुणीचा पुढाकार, पाहा Video बाजारपेठेत लगबग ईद हा सण मुस्लिम बांधवांचा पवित्र सण आहे. त्यामुळे या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. विविध वस्तूंची खरेदी विक्री सुरू आहे. या सर्व गोष्टींसाठी नाशिकची बाजारपेठ सज्ज झाली असून त्यामध्ये लगबग वाढली आहे. त्याचबरोबर मशिदीमध्येही अलविदा पठण सुरू करण्यात आले आहे.