जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / सत्तारांच्या नाराजीनंतर शिंदे गटाची प्रतिक्रिया; केसरकरांनी थेट सांगून टाकलं; म्हणाले..

सत्तारांच्या नाराजीनंतर शिंदे गटाची प्रतिक्रिया; केसरकरांनी थेट सांगून टाकलं; म्हणाले..

सत्तार स्वकीयांवर नाराज?

सत्तार स्वकीयांवर नाराज?

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

कोल्हापूर, 31 डिसेंबर : शिंदे गटातील अंतर्गत धुसफूस कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निमित्ताने बाहेर आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या घरात झालेल्या चर्चेतील गोष्टी बाहेर येत असल्याने कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी नाराजी जाहीर केली. यावेळी त्यांनी थेट नाव घेतलं नसलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली असल्याचे सांगितले आहे. इतकंच नाही तर आपल्याविरोधात रचण्यात आलेल्या कटात पक्षातील नेता सहभागी असू शकतो असं सूचक विधानही त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केलं होतं. यावर आता शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं बोलणं किती गंभीरतेने घ्यायचे हे मला माहीत नाही : दीपक केसरकर टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, “अब्दुल सत्तार अनेकवेळा गमतीने बोलत असतात. त्यामुळे ते किती गंभीरतेने घ्यायचे हे मला माहीत नाही. काही झाले असेल तर निश्चितपणे त्यात लक्ष घातले जाईल. पण पक्षांतर्गत घडामोडी झाल्या असतील तर त्याच्या चर्चा बाहेर करायच्या नसतात. या प्रकरणात मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. पक्षांतर्गत बाबींची जाहीर चर्चा करण्याची पद्धत कुठल्याही पक्षात नसते. आमच्याही पक्षात तशी पद्धत नसते. याची आम्ही काळजी घेऊ.”, असे केसरकर म्हणाले. वाचा - एकनाथ खडसेंच्या सुनबाई खासदार रक्षा सासऱ्याच्या मदतीला; गिरिष महाजन म्हणतात.. अब्दुल सत्तार काय म्हणाले होते? तुमच्या विरोधातील कटात कोण सहभागी आहे असं विचारलं असता ते म्हणाले “आमच्या पक्षातील असतील, काही हितचिंतक असतील किंवा विरोधी पक्षात ज्यांच्या खूर्च्या रिकाम्या झाल्या तेही असू शकतात”. त्यामुळे सत्तार यांचा रोख नेमका कोणाकडे आहे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरात झालेली चर्चा बाहेर येत असल्याचं सांगत नाराजी जाहीर केली. “आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरात चर्चा करत होतो. ती चर्चा बाहेर आली तेव्हा मी त्यांना चुकीच्या बातम्या बाहेर येत असल्याचं सांगितलं. मी कोणाचंही नाव घेतलं नाही. त्याचा तपास मुख्यमंत्री करणार आहेत, त्यांच्याकडे मी तक्रार केली आहे”.

News18लोकमत
News18लोकमत

विरोधी पक्षात माझे हितचिंतक : सत्तार “विरोधी पक्षात माझे फार हितचिंतक आहेत. माझ्यासारख्या अल्पसंख्यांक समाजाच्या माणसाला इतकं महत्वपूर्ण खातं कसं दिलं याबद्दल काही लोकांच्या मनात खदखद आहे. पण ते त्याचं काम करतात मी माझं काम करतो,” असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या आरोपांना उत्तर देताना मी राष्ट्रवादी पक्षात आलो नाही याची चीड आहे का? अशी विचारणा केली. मी लोकांसाठी लढत आहे, भांडत आहे, काम करत आहे. काही लोक मात्र फक्त उद्योगपतींसाठी काम करतात असा आरोपही त्यांनी केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात