ज्ञानेश्वर साळुंखे, कोल्हापूर 16 सप्टेंबर : एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांनी केलेल्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. दुसरीकडे शिंदे आणि फडणवीस सरकार राज्यात स्थापन झालं. यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट शिवसेनेत पडल्याचं पाहायला मिळालं. या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरूच असते. मात्र, आता एक धक्कादायक घटना कोल्हापूरमधून समोर आली आहे. यात शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग करण्यात आला आहे.
एकनाथ शिंदेंचा ठाकरेंनंतर आता पवारांना धक्का; नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार याप्रकरणी ठाकरे गटाच्या शहर प्रमुखासह 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत शिंदे गटाच्या स्टेजसमोर या सर्वांनी लज्जा उत्पन्न होईल असं वक्तव्य करत डान्स केल्याचा आरोप केला गेला आहे. याप्रकरणी शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील फिर्यादी या कोल्हापूर शहर शिवसेना या राजकीय पक्षाच्या संघटक आहेत. फिरंगाई तरुण मंडळ शिवाजीपेठ कोल्हापूर यांची मिरवणूक आलेली असताना हा प्रकार घडला. सध्या शिवसेना पक्षात पडलेले दोन गट आणि त्यांच्यातील वाद रागात धरून हे कृत्य करण्यात आल्याचं फिर्यादीने म्हटलं आहे. शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक धक्का; बारामतीतील हा मोठा प्रकल्प जुन्नरला हलवणार तक्रारीत म्हटलं आहे, की सध्याच्या राजकीय घडामोडींचा राग डोक्यात धरून या व्यक्तींनी दहशत माजवण्याच्या उद्देशाने फिर्यादी आणि स्टेजवर उपस्थित असलेल्या इतर महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात सुरुवात केली. आरोपींनी महिला पदाधिकाऱ्यांकडे पाहून हातवारे करत लज्जा उत्पन्न होईल अशा भाषेचा वापर केला आणि शिवीगाळ केल्याने हा गुन्हा दाखल केला गेला आहे.